कांद्यामुळे अश्रू आटलेत आणि आयुष्याचा झालाय लाल चिखल !

सुभाष कच्छवे: जगाच्या पाठीवर एकमेव घटक असा आहे, की त्याने पिकविलेल्या धान्याचा व फळभाज्यांचा भावही ठरवण्याचा अधिकार त्याला नाही. तो घटक म्हणजे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी होय, आज कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू काढत असून टोमॅटोचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे टोमॅटोचाही लाल चिखल झाला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू येत असताना दुर्दैवाने याची चर्चा मात्र समाजमाध्यमांत होत नाही. कुणाला काहीच वाटत नाही. कृषीप्रधान म्हंटल्या जाणाऱ्या देशात हीच तर खरी शोकांतिका आहे.

कांद्याचे भाव वाढल्यानंतर कांदा कसा रडवतोय याची रसभरीत वर्णने विविध माध्यमातून केली जातात. एरवी भौतिक सुखासाठी अन्य वस्तुंवर शेकडो रुपये उधळणाऱ्या आम्हांला कांदा चाळीस रुपये किलो झाल्यावर सहन होत नाही. शेतीमालाचे भाव वाढले की त्यावर ओरड व्हायला लागते. माध्यम जगतही पिकविणाऱ्याच्या नाही तर ग्राहकांच्या बाजूने उभे राहते, आज कांदा अगदी दोन ते तीन रुपये किलोने विकतो आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अगदी रडकुंडीला आला आहे. तो उध्वस्त झाला आहे. याची रसभरीत वर्णने कधी माध्यम जगताचा विषय होत नाहीत. ती कधी चर्चिल्या जात नाहीत. सगळी व्यवस्था बळीराजाचे शोषण करायला बसली असताना त्याच्या विषयी कोणालाच कणव वाटू नये हा सलणारा आणि तितकाच सतावणारा प्रश्न आहे.

Rohan Deshmukh

सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार भास्कर चंदनशीव यांनी आपल्या लाल चिखल या कथेत, आठवडी बाजारात टोमॅटोचे भाव पडताना एक ग्राहक चक्क आठाणे रुपये किलोने टोमॅटो मागतो. त्यामुळे त्या शेतकऱ्याचा राग अनावर होवून तो टोमॅटोच्या डाली रस्त्यावर फेकून देत त्यावर कचाकचा नाचायला लागतो. आपला राग व्यक्त करायला लागतो. पिकविणाऱ्याच्या मालाचे मोल नसेल तर आपण पिकविलेल्या मालाची आपणच नासाडी केली तर बिघडले कुठे ? कांद्याचे भाव पडल्यामुळे आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. तर टोमॅटोचा लाल चिखल झाला आहे. अश्रू आणि लाल चिखल शेतकऱ्यांच्याच नशीब का ? शेतीशिवाय असा दुसरा आतबट्याचा धंदा आहे का हो !

नसेल परवडत तर कांदा खावू नका, पण शेतकऱ्याला भाव मिळू द्या- सुभाष देशमुख

Latur Advt
Comments
Loading...