अडचणीच्या काळात नवऱ्याच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या धनश्री विखे पाटील

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील युवा खासदारांमध्ये खासदार सुजय विखे पाटील यांचे नाव नेहमीच चर्चेत असते. सुजय यांच्या भाजप पक्ष प्रवेशावेळी त्या विशेष चर्चेत आल्या. त्यावेळी सुजय यांच्या सोबत माध्यमात झळकणाऱ्या सौ. धनश्री सुजय विखे पाटील यांच्याविषयीची चर्चाही सोशल मीडियावर रंगली होती.

सुजय यांनी बंडाचे निशाण फडकविले तेव्हा राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या. आघाडीची साथ सोडल्याने त्यांच्यावर मोठ्याप्रमाणावर टीका देखील होत होती मात्र या निर्णायक क्षणी धनश्री ठामपणे त्यांच्यासोबत होत्या.

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला राम राम ठोकत सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सुजय विखे यांनी अहमदनगरची उमेदवारी देखील जाहीर झाली होती. सुजय विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. पण अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना सुजय विखेंचा पत्नी धनश्री विखे यांनीही भाजपकडून अर्ज भरला होता. त्यामुळे अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळते याबाबत फारच उत्सुकता निर्माण झाली होती.

दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार मूळ औरंगाबादचे माहेर असलेल्या धनश्री यांचे आडनाव कुंजीर आहे. त्यांचे वडील बांधकाम व्यावसायिक असून घरात पाच काकांचे मिळून एकत्र कुटुंब आहे. लग्नापूर्वी बी.सी.एस.आणि नंतर फायनान्समध्ये एमबीए केले आहे.

२०१०रोजी डॉ. सुजय यांच्याशी विवाहबद्ध होऊन विखे पाटील कुटुंबात आल्या. सुजय आणि धनश्री या दांपत्याला अनिशा नावाची मुलगी आहे. सुसंवादी, सुसंस्कृत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये वहिनी आणि ताई या नावाने परिचित आहेत.

स्वभावाने शांत असलेल्या धनश्री सुरुवातीला फारशा ऍक्टिव्ह नव्हत्या. पण काही वर्षांनंतर मात्र त्यांच्या सासूबाई आणि अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांच्या बचतगट विस्तारात देखील बऱ्यापैकी आहे. याशिवाय एक शाळाही चालवतात.

महत्वाच्या बातम्या