केशरकाकू-एक राजकीय झंजावात

keshar kaku

भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी असलेल्या बीड जिल्ह्याने देशाला आणि राज्याला अनेक कर्तृत्ववान माणसं दिली. आपल्या नेतृत्वाने ज्यांनी जिल्ह्याचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवले यांपैकी सर्वप्रथम ज्यांचा उल्लेख करावा वाटतो त्या म्हणजे बीड जिल्ह्याच्या एका अर्थाने शिल्पकार माजी खासदार स्व. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर.

एका सर्वसामान्य घरात जन्मलेल्या स्त्रीने समाजकारणाचा वसा हाती घेऊन आयुष्यभर जनतेच्या हिताची कामे केली. ज्याकाळी स्त्रीयांना समाजात अनेक बंधने होती त्याकाळात प्रस्थापित राजकारण्यांविरोधात संघर्ष करून जनसामान्यांचे प्रश्न त्यांनी हिरीरीने मांडले. देशातील सहकार क्षेत्रात साखर कारखान्याच्या पहिल्या महिला चेअरमन होण्याचा मान केशरकाकुंनी आपल्या कर्तृत्वाने मिळवला.असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक यशस्वी महिलेच्या यशामध्ये तिच्या पतीने दिलेलं स्वातंत्र्य आणि साथ महत्वाची असते. आदरणीय काकुंच्या संघर्षामध्ये त्यांचे पती स्व. सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ नाना हे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे होते.

Loading...

३० मार्च १९२७ रोजी कर्नाटकातील वैजापूर जिल्ह्यात जन्मलेल्या केशरकाकु यांनी १९६२ मध्ये नवगण राजूरी येथून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. त्यानंतर सरपंच, पंचायत समिती सभापती अशी विविध पदे भूषवत जिल्ह्याच्या राजकीय पटलावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.१९७२ मध्ये चौसाळा मतदारसंघातून त्या आमदार म्हणून निवडून आल्या. तेव्हा पडलेल्या दुष्काळात स्व. काकुंनी केलेलं काम बीडची जनता कधीच विसरणार नाही.त्यांनंतर १९८० मध्ये त्या लोकसभेची निवडणूक जिंकून देशाच्या संसदेत गेल्या. सलग तीन टर्म बीड च्या खासदार म्हणून निवडून यायचा विक्रम अजूनही त्याच्याच नावावर आहे.

मागासलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात आदरणीय काकुंनी शैक्षणिक संस्थांचं जाळ उभं करून वंचित, पिडित आणि गरीब कुटुंबातील मुला-मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, फार्मसी, कृषी महाविद्यालय यांची उभारणी करून मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी उपलब्ध असणार्या सर्व शैक्षणिक सुविधा आपल्या बीड जिल्ह्यात त्यांनी उपलब्ध करून दिल्या तसेच ग्रामीण भागात शाळा आणि महाविद्यालयांची उभारणी करुन दीन-दलित, उपेक्षित सामान्य घटकाच्या अंधकाररुपी आयुष्यात ज्ञानरुपी ज्योत पेटवण्याचं काम आदरणीय काकुंनी केलं. या संस्थांमधील अनेक विद्यार्थी देश-विदेशात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.

सामाजिक जीवनात वावरत असताना कोणतीही जात-पात, धर्म-पंथ असा भेदभाव न करून सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेऊन स्व. काकुंनी आयुष्यभर विकासाचं राजकारण केलं.अल्पसंख्यांक समाजातील दोन व्यक्तींना आमदार करण्यांचं श्रेय बीड जिल्ह्यात फक्त आणि फक्त स्व. काकुंनाच जातं. माजी आमदार सिराज देशमुख आणि सय्यद सलीम यांच्या विजयात आदरणीय केशरकाकु क्षीरसागर यांचा सिंहाचा वाटा होता.बीड-नगर-परळी रेल्वे मार्गाची सर्वप्रथम मागणी स्व. केशरकाकू यांनीच संसदेत केली.

राजकीय जीवनात वावरत असून देखील कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्रांकडे त्यांचं विशेषकरून लक्ष असायचं. अनेक उद्योन्मुख कलावंतांना प्रोत्साहन देण्याचं काम त्या सदैव करत असत.शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे मार्गक्रमण करणार्या आणि नवगण राजूरीच्या सरपंच पदापासून देशाच्या संसदेपर्यंत आपली कार्यपताका फडकवत ठेवणार्या स्व. केशरबाई क्षीरसागर यांची आज पूण्यतिथी.

४ ऑक्टोबर २००६ सर्व जिल्हावासियांना पोरकं करून आदरणीय केशरकाकू आपल्यातून गेल्या. त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन.
-कौशल मुकुंदराव खडकीकर, बीड

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

वारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
मंत्र्यांची तत्परता : वीरपत्नीच्या मदतीला धावले बच्चू कडू...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
मशिदींना हात लावल्यास रिपब्लिकन पक्ष मुस्लिमांच्या पाठीशी उभा राहील - रामदास आठवले