कमलेश नगरकोटी:भारताच्या अंडर १९ संघातील मुलुखमैदानी तोफ

kamlesh

दीपक पाठक- १९९९ च्या वर्ल्डकपमध्ये जवागल श्रीनाथने १५४.५ kmph च्या वेगाने एक बॉल टाकला होता.भारतीय क्रिकेट रसिकांनी त्यावेळी अक्षरशः तोंडात बोटे घातली होती.२००८ साली इशांत शर्मा ने ऑस्ट्रेलिया विरोधात खेळताना १५२.६ kmph च्या वेगाने बॉल टाकला त्यावेळी कांगारूंच्या वेगवान गोलंदाजांच्या तोडीचा शर्मा भारतीय गोलंदाज होऊ शकतो अशी चर्चा झाली. त्यानंतर २०१४ मध्ये श्रीलंकेच्या विरोधात खेळताना वरून एरोन ने १५२.५ kmph च्या वेगाने बॉल टाकून क्रिकेट रसिकांना आश्चर्यचकित केलं परंतु यापैकी कोणत्याही गोलंदाजाला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आलं नाही हि वस्तूस्थिती आहे.

Kamlesh-Nagarkoti-bowling

असं असल तरीही भारताच्या अंडर १९ संघातील एक गोलांदाज विरोधी संघाला फक्त बॉलिंग नाही तर अक्षरशः तोफांचा मारा करत असल्याचं चित्र आहे .कमलेश नगरकोटी,वय अवघ १८ वर्ष.जयपूरचा हा पठ्ठ्या न्यूझीलंडमध्ये सुरु असणाऱ्या वर्ल्डकपमध्ये तब्बल १४९ kmph च्या वेगाने बॉल टाकून सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला आहे. अंडर १९ वर्ल्डकप मध्ये भारताच्या गोलंदाजीचा कणा म्हणून कमलेश समोर आला आहे.

सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला १०० रन्स ने हरवणाऱ्या टीम इंडियाच्या विजयात या गोलंदाजाचा सिंहाचा वाटा आहे. कमलेश ने या सामन्यात ७ षटकात ३ बळी घेतले आणि त्यापैकी एक निर्धाव ओव्हर केली. त्या सामन्याचे समालोचन करणारे वेस्ट इंडीज चे माजी कप्तान इयान बिशप यांनी कमलेश ची गोलंदाजी पाहून भारताच्या वेगवान गोलंदाजीच भविष्य उज्वल असल्याची स्तुतिसुमने उधळली आहेत.

nagarkoti

टीम इंडियाच्या निवड समिती बरोबरच अनेक दिग्गजांच्या तसेच आयपीएल च्या संघाच्या मालकांच देखील या वर्ल्डकपवर नजर ठेवून आहेत .
Kamlesh-Rahul-Dravid      आगामी काळात आपल्या कामगिरीत किती सातत्य राखण्यात कमलेश यशस्वी ठरतो हे स्पष्ट होईलच परतू वेगवान भारताच्या गोलंदाजीच्या ताफ्यात कमलेश नगरकोटी नावाची मुलुखमैदानी तोफ सामील होण्यासाठी सज्ज असल्याच चित्र आहे.