जवाहरलाल नेहरू विद्यापीठ… शिक्षण आमच्या हक्काचं…

शुभंकर बाचल
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, देशातील एक सर्वोत्तम विद्यापीठ. या विद्यापीठाची स्थापना २२एप्रिल १९६९ रोजी दिल्ली येथे झाली. त्यावेळी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये प्रस्ताव पारित करून या विद्यापीठाची स्थापना झाली. मोहम्मद अली करीम छागला हे केंद्रीय शिक्षण मंत्री होते. स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे या विश्वविद्यालयाला नाव दिले.

या विद्यापीठाच्या स्थापने मागील उद्देश हा खूप स्वच्छ आणि विद्यार्थी हिताचा होता. जसे की देशातील युवकांना चांगल्या प्रकारचे आणि सर्व क्षेत्रांमधील शिक्षण मिळावे, गरीब विद्यार्थ्यांना परवडेल असे शिक्षण मिळावे, विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवण्याची उत्तम सोय व्हावी, त्यांना अनुकूल वातावरण असलेली जागा अभ्यासासाठी व्हावी. हे प्रमुख उद्देश या स्थापनेमागे होते.

Loading...

या विश्वविद्यालयाचा परिसर एकूण १०१९ एकर मध्ये पसरलेला आहे. जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या अंतर्गत अनेक राष्ट्रीय व सुरक्षा दलांचे महाविद्यालये येतात. जसे की, Army Cadet College, Dehradun. College Of Military Engineering, Pune. National Defence Academy, Pune. Indian Naval Academy, Ezhimala. Central Drug Research Institute, Lucknow. Centre for Cellular and Molecular Biology, Hyderabad. Institute of Microbial Technology, Chandigarh इ. दरवर्षीच्या UPSC च्या निकालाप्रमाणे २०% विद्यार्थी JNU मधील असतात. पण हा झाला इतिहास.

आता जर JNU बद्दल बघायला गेलो तर JNU चे प्रतिवर्षाचे आर्थिक बजेट २०० कोटी रुपये इतके आहे. विश्वविद्यालयामध्ये एकूण ६१४ शिक्षक व ८४३२ विद्यार्थी येतात. त्यामध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी ९०५ विद्यार्थी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी २१५० विद्यार्थी, डॉक्टरेट शिक्षणासाठी ५२१८ विद्यार्थी आणि इतर विद्यार्थी १५८ असे एकूण विद्यार्थी येतात.

जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील शैक्षणिक पॅटर्न पहिला तर असे दिसून येते की विद्यापीठात प्रवेश मिळाल्यावर किती वर्षांत शिक्षण पूर्ण करायचे याला कुठलेच बंधन नाही. १६-१७ व्या वर्षी विद्यापीठात प्रवेश घेऊन वयाची ५०-५५ वर्षे पूर्ण झाली तरीही तुम्हाला शिक्षण चालू ठेवता येते. शैक्षणिक शुल्क आणि वसतिगृह शुल्क बघितले तर २००-३०० रुपयात जेवणखाण, राहणे, शिकणे हे आरामात होते. वरती अभ्यास करायची कुठलीच सक्ती नाही. म्हणजेच थोडक्यात शिक्षणाच्या नावाखाली वर्षानुवर्षे अन्न आणि निवारा पुरवणारी संस्था असे स्वरूप या विश्वविद्यालयाला आले आहे.

जर करदात्यांच्या पैशांवर फुकटात आयुष्य घालवता येत असेल तर अशा ठिकाणी समाजविघातक तत्वे शिरली नाहीत तरच नवल. गेल्या काही महिन्यांत समोर आलेल्या बातम्या आणि फोटो पाहिले तर, आपल्याला लैंगिक गरजा पुरवण्याची सुद्धा आणि वेगवेगळे व्यसनाची सुद्धा सगळी सोय हे विद्यार्थी विद्यार्थिनीच परस्पर व उघडउघड लावून घेत असल्याने विद्यार्थी दशेतून बाहेर यायची गरज उरत नाही.

मग येतो मुद्दा विद्यार्थी चळवळीचा! एक ठिकाणी बसून संपूर्ण भारत पेटवून द्यायचा, देशातील वातावरण ढवळून टाकायचे, अराजकता माजवायची. मग अशा ठिकाणी स्युडो-लिबरल्स, स्युडो-सेक्युलर्स, नक्षलवादी चळवळ आणि तुकडे-तुकडे गँग तयार करण्याचे कारखाने तयार होतात आणि यांचाच उपयोग राजकारणी लोक आपापला अजेंडा राबवून घेण्यासाठी करतात.

त्या बाहेरील देशातील विद्यार्थ्यांकडे पाहिले तर दिसून येते की ते नवीन तंत्रज्ञान विकसित करणे, नवीन शोध,योजना, कल्पना अशामध्ये ते गुंतून आहेत. आणि आपल्या देशातील विद्यार्थी के करतायेत तर पोलिसांवर हल्ले, सरकारी मालमत्तेचे नुकसान, एकमेकांवर हल्ले. हे योग्य आहे का? भविष्यातील विद्यार्थ्यांनी काय प्रेरणा आपल्याकडून घ्यायची? खरंच युवक देश चालवतील की पाडतील? असे अनेक प्रश्न मनात भिरभिरतायेत.

देशातील होतकरू तरुण विद्यार्थी, राष्ट्रीय हिताच्या उद्देशाने चालू झालेल्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन तेथील सद्यस्थितीमुळे राष्ट्रविघातक कृत्य करतो की काय? अशी भीती मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. मग सद्यस्थितीत अशा प्रकारचे विश्वविद्यापीठ राष्ट्रद्रोहींचा अड्डा बनणार असेल तर ते सरकारी खर्चावर व सुविधांवर सुरू ठेवावे की नाही असाही प्रश्न आज देशातील नागरिकांमध्ये आणि प्रशासनामध्ये निर्माण होतोय. आणि असे विश्वविद्यापीठ चिंतेचा विषय ठरतोय.

(या लेखात व्यक्त केलेली मतं ही लेखकाची वैयक्तिक मतं आहेत याचा महाराष्ट्र देशाशी काहीही संबंध नाही)

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार