लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेब : भारताच्या राजकारणातील ध्रुवतारा

०३ जुन २०१८ : लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांची चौथी पुण्यतीथी, साहेबांना जाऊन बघता बघता चार वर्षे झाली मात्र आज मागच्या तीन वर्षांप्रमाणेच ०३ जुन जवळ येताच मन परत २०१४ च्या त्या काळ्या दिवसांमध्ये प्रवेश करत आहे. साहेब आज आपल्यात नाहीत हे मानायला अजूनही मन धजावत नाही. चार वर्षे झाली तरीही साहेबांच्या अवेळी जाण्याने जो आघात झाला होता ती जखम अजूनही भरून येत नाही..माझ्यासारखीच लाखो लोकांची अवस्था हिच आहे. काही लोकांना हे अतिशयोक्तीही वाटेल कि एखाद्या राजकीय नेत्यावर एवढं प्रेम कसं काय असु शकतं ? असा प्रश्न सुध्दा अनेकांना पडत असणार. परंतू स्व.मुंडे साहेबांच्या बाबत हेच वास्तव आहे.

जन्मभर लोकांच्या हृदयात आणि मरणोपरांत लोकांच्या हृदयाबरोबर देवघरात मुंडे साहेब पोहोचले आहेत , गावात सप्ताहाच्या पत्रिका असतील अथवा लग्न समारंभाच्या पत्रिका असतील लोक अशा प्रत्येक शुभ कार्याच्या प्रसंगी अठरा पगड जाती धर्मातील लोक साहेबांचा फोटो वापरत आहेत. या देशात लोकांचे एवढं प्रेम आणि आदर मिळवणारे हजारो नेते झाले असतील , यापुढेही होत राहतील परंतु ध्रुवताऱ्या प्रमाणे जे अढळस्थान लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांना मिळालं आहे हे कदाचीत इतर कोणत्याही नेत्याला मिळवने कधीच शक्य होणार नाही..

Loading...

माझ्याबाबत सांगायचं झालं तर राजकारणातला ‘र’ सुध्दा माहीती नव्हता तेंव्हापासून मुंडे साहेब हे नाव जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेलं आहे. लहाणपणापासून ज्या गोपीनाथ मुंडे नावाला ऐकत , बघत आणि वाचत आलो त्या मुंडे साहेबांना मी प्रत्यक्षात बघण्याचा योग साहेबांच्या गोदापरिक्रमा या यात्रेदरम्यान आला होता. गंगाखेड तालुक्यातील महातपुरी या गोदावरी च्या काठावर वसलेल्या गावात साहेब येणार होते. आणि म्हणून मी माझा मोठा भाऊ केशव नागरगोजे यांच्या सोबत हट्ट करून गेलो होतो, भाषणात काय बोलत आहेत ते समजत नव्हतंच परंतु मला आजही साहेबांनी भर पावसात ट्रक वर उभा राहून पावसात भिजत केलेलं भाषण आठवतंय. हजारो लोक पावसात भिजत माझं भाषण ऐकत असताना मी छत्रीखाली उभा राहून बोलूच शकत नाही असं साहेब त्यावेळी बोलले होते.. मुंडे साहेबांची ती प्रतिमा माझ्या डोळ्यांच्या पटलावर कायमची जतन झालेली आहे.

अनेक नेते जन्माला येतात , मोठ मोठ्या पदावर कार्य करतात , यशाची नवनवी शिखरे सुध्दा गाठतात परंतु एकदा का त्यांची खुर्ची गेली की लोकांच्या विस्मृतीत जायला त्यांना वेळ लागत नाही . मरणोपरांत तर अशा नेत्यांचे नाव लोकांच्या तोंडी राहणे तर अशक्यच , परंतु लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखी काही मोजक्या विभुती याला अपवाद असतात . म्हणूनच मुंडे साहेबांसारख्या नेत्यांना ‘लोकनेता’ हि पदवी लागलेली असते , नेता आणि लोकनेता या शब्दांमधला हाच काय तो एकमेव आणि महत्वाचा फरक सांगता येईल.

साहेबांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यासाठी शब्द कमी पडतात , आजवर मुंडे साहेबांच्या कार्यावर भरपूर लेखन झालेलं आहे , पुढेही होत राहील परंतु त्यांचे मोठेपण शब्दांत व्यक्त करता येणार नाही . एका छोट्याश्या खेडेगावातून जन्माला आलेल्या मुंडे साहेबांनी गेल्या चार दशकांपासून महाराष्ट्रातल्या गोरगरीब , कष्टकरी , शेतकरी, शोषित बहुजन समाजातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे . कारण मुंडे साहेबांच्या बोलण्यात आणि आचरणात काहीही फरक नसायचा ; ते जे बोलायचे तेच करायचे .साहेबांनी सत्ता आणि स्वार्थासाठी स्वतःच्या तत्त्वांशी कधीच तडजोड केली नाही . ती तडजोड केली असती तर मुंडे साहेब कधीच सत्तेच्या बाहेर राहीले नसते. महाराष्ट्रातील इतर तथाकथित राजकीय नेत्यांप्रमाणे लाचारी करून , किंवा कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवण्यापेक्षा मुंडे साहेबांनी संघर्ष करून सत्तापरिवर्तन करण्याचे ठरवले आणि ते शिवधनुष्य यशस्वी रित्या पेलले सुध्दा .

शिवनेरी ते शिवतीर्थ अशी संघर्ष यात्रा काढून तात्कालिक गुन्हेगारीवर स्व.मुंडे साहेबांनी फक्त रान पेटवले , ते फक्त एवढ्यावरच शांत बसले नाहीत तर लोकांना दिलेल्या वचनाप्रमाणे सत्तेवर आल्यानंतर त्यांनी मुंबई ला अंडरवर्ल्ड पासुन मुक्त केले . त्यावेळचे मुख्यमंत्री असलेले नारायण राणे , मनोहर जोशी यांच्यासारखे नेते आज स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहेत मात्र मुंडे साहेबांचे स्थान मात्र आज ते हयात नसताना ही हिमालायापेक्षा ही जास्त उंचीचे आहे. महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर इतका दिलदार, आणि बेरजेचं राजकारण करणारा सर्वसमावेशक नेता क्वचितच सत्ताकारणात पाहीला असेल. कुणाच्याही दावणीला बांधुन न घेणारा, कुणाच्याही छावणीत स्वाभिमानाशी तह न केलेला, बोले तैसा चाले अशी रोखठोक भुमिका असलेला लोकनेता अशी साहेबांची ओळख महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला होती. म्हणूनच देशातील बहुजन समाजाने २००९ च्या लोकसभेनंतर त्यांना आपला नेता मानलं होतं.

अनेक मोठं मोठ्या राजकीय नेत्यांचे वारसदार आज राजकारणात आहेत. परंतू मुंडे साहेबांच्या लेकीं प्रमाणे आपला वेगळा असा ठसा कोणाला उमटवता आलेला नाही. पंकजाताई असतील अथवा प्रितमताई असतील दोन्ही भगिनींनी आपल्या कामातून त्या मुंडे साहेबांचा वारसा कशा सक्षमपणे चालवत आहेत हे वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे.. कुठल्याही मुलीने बनवले नसेल असे मुंडे साहेबांचे गोपीनाथगड हे स्मारक ताईंनी बनवले आहे. एखाद्या तीर्थस्थानाप्रमाणे लोकांच्या मनात गोपीनाथगड विषयी भावना आणि श्रध्दा निर्माण झाली आहे. १२ डिसेंबर (जयंती) आणि ०३ जुन (पुण्यतीथी) निमित्ताने गोपीनाथगडावर राज्यभरातून लाखोंच्या संख्येत लोक येतात.. आणि दरवर्षी हि संख्या वाढत जात आहे.. लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांप्रमाणेच ‘गोपीनाथगड’ लोकांना आधार आणि नवी उर्जा देण्याचं कार्य करत आहे.. करत राहील…

》संदीप नागरगोजे, गंगाखेड

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात