#व्यक्तिविशेष : देवेंद्र फडणवीस- भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेला महाराष्ट्राला लाभलेला स्वच्छ चारित्र्याचा मुख्यमंत्री

Devendra fadnvis

सत्यम सिद्धेश्वर जोशी- २०१४ मध्ये सगळीकडे मोदीमय वातावरण झाले होते . काँग्रेस च्या इतक्या वर्षांची सत्ता देशात संपुष्टात आली आणि केंद्रामध्ये सत्ता परिवर्तन झाले त्या सोबत महाराष्ट्र राज्यात हि सत्ता परिवर्तन झाले त्यात महाराष्ट्रात विधान सभा निवडणुकी मध्ये सगळे पक्ष वेगळे लढले व कोणालाही स्पष्ठ बहुमत नव्हते . भाजप १२३ आमदार जिंकत सर्वात मोठा पक्ष बनला व राष्ट्रवादी कांग्रेस ने भाजप ला बाहेरुन पाठींबा दिला .

स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती, कुशल युवा राजकारणी आणि आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग असलेले देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले . देवेंद्र फडणवीस भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते संपुर्ण निवडणुक त्यांच्या जोरावर लढली होती .केंद्रीय भाजप नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले व देवेंद्र फडणवीस हे नाव महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झाले.

वारसा हक्कानं राजकारण मिळालं असलं तरी देखील देवेंद्र फडणवीस यांनी आपली कारकिर्द स्वबळावर निर्माण केली आहे. आपल्या महाविद्यालयीन जीवनात असताना देवेंद्र फडणवीस हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते सक्रिय सदस्य होते. त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि जनसंघात कार्यरत होते या व्यतिरीक्त ते विधान परिषदेचे सदस्य देखील होते. देवेंद्र फडणवीस यांनी लॉ ची पदवी मिळवलेली आहे व बिजनेस मॅनेजमेंट चा देखील त्यांनी अभ्यास केलेला आहे. १९९९ पासुन आतापर्यंत ते महाराष्ट्राच्या विधानसभेचे ते सदस्य राहिले आहेत.

१९८९ भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूरमधील वॉर्ड अध्यक्ष होते. १९९९ ते आजतागायत – विधानसभा सदस्य आहेत. १९९२ ते २००१ सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य, दोन वेळा नागपूरचे महापौर होते. १९९४ भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष होते. २००१ भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते.२०१० भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस होते. २०१३ भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष होते.

महाराष्ट्र राज्यात एक प्रथाच जणू तयार झाली होती कि एकही मुख्यमंत्री आपला संपुर्ण कार्यकाळ पुर्ण करत नाही परंतु देवेंद्र फडणवीस जी यांनी प्रथा खंडीत केली व आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण केला . स्व वसंतराव नाईक यांच्या नंतर देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री आहेत कि ज्यांनी एक अखंंड कार्यकाळ पुर्ण केला आहे. या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक काम केले आहेत त्यातले मोजके बघायचे झाले तर मराठा आरक्षण , शेतकरी कर्जमाफी ,जलयुक्त शिवार , नियुक्त्यांसाठी पोर्टल, पत्रकार सन्मान योजना ,एस. टी महामंडळात महिलांना चालक म्हणून संधी , खासगी संस्थाचालकांच्या आवळलेल्या मुसक्या, वॉटर ग्रीड औद्योगिक विकासासाठी प्रयत्न, अशी अनेक काम देवेंद्र फडणवीस यांनी केली आहेत हे नाकारून चालणार नाही .

देवेंद्र फडणवीस हे रोज १५ ते १६ तास काम करायचे , ते रात्री २ -३ वाजेपर्यंत बैठका घेत असत , मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रशासनावर असलेली पकड, इतकी संकटे येऊनही त्यातून काढलेले मार्ग हे सगळंच दाद देण्यासारखंच आहे .पाच वर्षात स्वतःवर एकही डाग लागू दिला नाही.. त्यांच्या चारित्र्यावर देखील कोणी बोट दाखवू शकलं नाही !

गर्व असणं, अतिआत्मविश्वास नडणं, मनमानी करणं वगैरे दोष फडणवीसांमध्ये आहेत असं सोशल मीडीयातून बिनदिक्कतपणे पसरवलं गेलं. पण ह्याचं एकही उदाहरण गेल्या पाच वर्षांमध्ये दिसलेलं नाही. याउलट, फडणवीसांच्या वाट्याला हिणकस शेरेबाजी, टिंगलटवाळी आणि अर्वाच्य शिवीगाळ याव्यतिरिक्त काहीच आलेलं नाही. देवेंद्र फडणवीसांवर जे जे आरोप झाले ते ते सगळे व्यक्तिगत, खाजगी आयुष्याबद्दलच झाले. त्यांच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक आयुष्यावर बोट दाखवावं असं काहीच नाही, हे तर त्यांचे कट्टर विरोधकही उघडपणे मान्य करतात.इतक्या चातुर्याने पाच वर्षे राज्याचा कारभार करणारे फडणवीस या सर्वातून बोध घेऊन पुन्हा आत्मविश्वासाने आले तर नवल वाटायला नको.

महत्वाच्या बातम्या-

५० टक्के कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ न दिल्यास कंपन्यांवर होणार कारवाई

भारतात कोरोनाच्या हाहाकार, मागील २४ तासांत रेकॉर्डब्रेक रुग्णाची वाढ

बकरी ईदच्या दिवशी प्रतीकात्मक कुर्बानी शक्य नाही – इम्तियाज जलील

‘स्वतःचे अपशय झाकण्यासाठी विरोधकांची मुस्कटदाबी करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’

सिरमच्या ५० टक्के लसी भारतीयांसाठीच, लोकांना त्या विकत घेण्याची गरज नाही; पुनावालांचा दावा