बाहुबली सिनेमाचा सेट वाटावा एवढं सुंदर स्थळ तुम्हाला ठाऊक आहे का ?

प्रवीण डोके : पुण्याच्या भोवताली बाहुबली सारखं सुखद नि बेफाम व्हायला लावेल असं ठिकाण आहे असं सांगितलं तर लोकांचा विश्वास बसणार नाही पण होय, हे शक्य आहे.देवकुंड त्याचं नाव !

Loading...

या धबधब्याला भेट देणं म्हणजे आपल्या प्रेयसीची वाट बघण्यासारखा क्षण असतो. कारण देवकुंडला उठायचं आणि निघायचं इतकं ते अचानक होत नाही. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आधी हवामानाचा अंदाज घ्यावा लागतो. जाणाऱ्या दिवशीचे नियोजन आठवडाभर आधी करावे लागते. कारण आठवड्याभरात किती पाऊस झाला त्या सरासरी वरून पावसाचा जोर कमी असेल तरच हे ठिकाण निवडावे.

उन्हाळा-हिवाळा देवकुंडला सहन होत नाही. आणि पावसाळा जास्त झाला की देवकुंड आपल्याला आत येऊ देत नाही. कारण देवकुंड ज्याप्रमाणे निसर्गरम्य आहे, तितकेच ते धोकादायक आहे. पण धोकादायक आहे म्हणून त्याच्यातील सौंदर्य हे सृष्टीच्या स्वच्छतेचा आणि मंत्रमुग्ध वृंदावनाचा उत्तम नमुना आहे.

रायगड जिल्ह्यातील देवकुंड हे पुण्याहून साधारण ११० किलोमीटर अंतरावर आहे.हवामान अंदाजानुसार देवकुंडला जाणे ठरले की मग मात्र खरं अडवेंचर सुरू होते.हे सगळं जुळून आलं, अन् माझा ‘देवकुंड प्रवास’ सुरू झाला…हा प्रवास मुद्दामच टू व्हीलर आणि माझा होता. कारण देवकुंड म्हणजे निसर्गाची सफर असते. ती कारच्या बंद काचांतून निसर्ग बघून अनुभवण्यास मजा नसते.

देवकुंडला जाताना आभाळ भरून आलेल होतं. वारा हळवा येत होता. झाडांची पाने मुसमुसत होती. रस्त्याला गर्दी कमी म्हणून गाडीचा वेग निसर्गाइतका झपझप होता. पावसाचा एक एक थेंब कपाळावरून पापण्यांवर आणि हळूच गालांवर ओघळत होता.

पावसाची संततधार, समोर दिसणाऱ्या बेफिकीर डोंगररांगा, त्यावरून वाहणारे दुधासारखे धबधबे… अधेमधे गावाकडचं जीवन अन धूरकट सरींच्या पडद्याआडचं दिसणार पर्दानशी जग, दरीतील झाडाच्या पानांवरील शेंड्याला आवेगाने बिलगणारा पाऊस अन् नितळ असणारा सारा निसर्ग…

हा निसर्गाचा मनोरम्य प्रवास असाच अविरत बॅकग्राऊंडला चालू राहतो. आणि हा पुणे, पौड गाव, पिरंगुट, मुळशी, पासून पुढे ताम्हिणी घाटापर्यंत मन शांत होऊन जातं. एका जादुई प्रवासासाठी.

ताम्हिणी पार करत मी देवकुंड ला पोहोचतो. तोच जंगलाच्या सुरुवातीला एक दोन गाईड आमची वाट बघत असतात, आत जाण्यास परवानगी नसल्याचे सांगतात. पण दोन दिवसात देवकुंड ला झालेला पाऊस कमी असल्यामुळे आम्ही आत जायचे ठरवतो. माझ्याबरोबर ८-९ जणांचा ग्रुप घेऊन ही वाट सुरु होणार असते. हा माझा दुसरा देवकुंड प्रवास असल्यामुळे मी १५०-२०० रुपये देऊन गाईडसोबत जाणे टाळतो. पण ज्यांचा पाहिलं प्रवास असेल त्यांच्यासाठी ही सोय उत्तम असते. कारण आत अंदाजे ७ ते ८ किमीचा ट्रेक जंगलातून करायचा असतो. त्यात पावसाची संततधार अन् या सगळ्यामुळे वातावरण अंधुक काळं झालेलं असतं.

तेव्हा हा काळोख्या अंधाराचा देवकुंड दुपारी चालायला सुरुवात करतो…

पावसाचे असंख्य थेंब केसातून, कानावरून, गालावरून उतरून मानेवरून ओघळत शर्टच्या कॉलरमध्ये विरत राहतात… जंगलातून वाट काढत काढत चालताना चारही बाजुला असणारी गर्द झाडी…. दूर दूरपर्यंत दिसणाऱ्या इथल्या पर्वत रांगा… या निसर्गाचे हे सौंदर्य पाहून एखाद्या स्वप्नाच्या दुनियेत तर नाही ना आलोय असा भास होतो… असं वाटत राहतं बाहुबली इथ तर शूट नाही ना झाला… यामुळे मन हुरळून जातं… पावसाच्या पाण्यामुळे भिजणारे शरीर आणि त्यासोबत चिंब चिंब भिजणारे मन… डोंगररांगावरती धुसर काळे विसावलेले ढग… खूपच लोभसवाणं नयनरम्य ते सह्राद्रीचं देखणं रूप पाहून माणूस भारावून तर जातोच पण तोंडातून आपसूकच ‘व्वा, आई शप्पथ कसल भारीय हे” असे शब्द बाहेर पडतात.. क्षणभर असं वाटलं, “अरे स्वर्ग म्हणतात तो हाच की काय ?…

“हा अदभुत निसर्ग बघताना कशाचच भान उरत नाही, हे मात्र तितकेच खरं… यात पावसाची रिमझीम सतत चालू असते… सूर्याला दाट ढगांनी झाकून टाकलेल असतं… पावसाच्या पाण्याचे थेंब ढगातून तूटून वेगात जमीनीवरती आपटत असतात… मोठमोठाल्या दगडी शिळा… अवाढव्य दगड गोटे… त्यातून छूनछून करत वाहणारे पाण्याचे झरे… अशा एका मोक्याच्या ओढ्यावर पाण्याच्या पायाच्या घोट्या इतक्या पाण्याचा शितोष्ण प्रवाहात चालताना मिळणारा आनंद तर काही वेगळाच असतो… अशावेळी अस वाटतं राहतं… हा अनुभव सतत घेत राहवा… आणि मग विचार स्वतःलाच ‘क्यो खुदको थकानेका बेकारमे?’Loading…


Loading…

Loading...