महाराष्ट्रातील ‘हा’ किल्ला जो एकेकाळी होता भारताची राजधानी

औरंगाबाद जिल्हा हा राज्यात पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखला जातो.महाराष्ट्रातील अनेक सुंदर आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळे औरंगाबाद जिल्हा आणि औरंगाबादमध्ये आहेत.अजिंठा,वेरूळ लेण्या,घृष्णेश्वराचे मंदिर,प्रति ताजमहल म्हणून ओळखला जाणारा मकबरा,पाणचक्की,आशा अनेक ऐतिहासिक पर्यटनस्थळांचा समृद्ध वारसा औरंगाबादला लाभला आहे.

Loading...

औरंगाबादपासून अवघ्या २५ किलोमीटर अनंतरावर असलेले आणखी एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणजे देवगिरी किल्ला. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असणारा हा किल्ला भुईकोट किल्ल्याचे सर्वश्रेष्ठ उदाहरण असून, गेली कित्येक शतके हा किल्ला यादव घराण्याच्या राजवटीची साक्ष देत उभा आहे. हा किल्ला मजबूत तटबंदीचे देखील एक आदर्श उदाहरण आहे, किल्ल्याच्या सुरवातीलाच भले मोठे मुख्य प्रवेशद्वार आहे, हत्तींकडून करण्यात येणारा हल्ला परतवण्यासाठी या दरवाजाला मोठमोठी लोखंडी सुळे लावण्यात आली आहेत. या दरवाज्यातून आत प्रवेश केल्यास आपल्याला पहारेकर्यांसाठी बांधलेली निवासस्थाने दिसतात मात्र आता त्याचे केवळ भग्नावशेषच शिल्लक राहिले आहे.

मुहम्मद बीन तुघलक (इ.स. १३२४-१३५०) या दिल्लीच्या सुलतानाने करून आपली सत्ता दक्षिणेतील मदुराईपर्यंत वाढवली. १३२६ मध्ये मुहम्मद बिन तुघलक ऊर्फ वेडा महंमद या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी देवगिरीवर आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले. दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. ही राजधानी परत दिल्लीला न्यावी लागली.

हा किल्ला आपण जसजसा चढत जातो तशी-तशी या किल्ल्याच्या भव्यतेची प्रचिती आपणास येते. थोडं पुढे गेल्यानंतर किल्याच्या डाव्याबाजूला भारतमातेचं भव्य मंदिर आहे.तसंच उजव्या बाजूला एक साधारण २०० फूट उंचीचा भव्य मिनार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत. हा मिनार आता पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. किल्ल्यावर जाण्याचा रस्ता अनेक धोकादायक भुयारी मार्गानी वेढलेला आहे.या किल्ल्यावर ठीक-ठिकाणी पाण्याचे टाके असल्याचं पाहायला मिळतं.आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला लागतो तो चिनी महल या महालाचे काम म्हणजे चिनी स्थापत्य शैलीचा एक उत्तरं नमुना आहे. याच ठिकाणी आपल्याला मेंढा तोफ देखील पाहायला मिळतील,मेंढा तोफ हे या किल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य दुसऱ्या कोणत्याही किल्ल्यावर न आढळणारी मेंढा तोफ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.या तोफेचा आकार मेंढीच्या तोंडा सारखा असल्यानं तिला मेंढा तोफ म्हणतात.

आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतो तो बारादरी महल, ही एक बारा दरवाजे असलेली आणि स्थापत्य शैलीचा उत्तम नमुना असलेली एक इमारत आहे.या ठिकाणावरून आपण किल्ला परिसरातील निसर्ग सौदर्य न्याहाळू शकतो. पुढे किल्ल्याच्या सर्वात उंच भागावर दुर्गा तोफ ठेवलेली आहे तसेच या ठिकाणी विजयी पताक फडकवण्याची जागा व पर्यटकांना विश्रांती घेण्याची सोय करण्यात आली आहे.यादव राजघराण्याचा व समकालीन इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी हा किल्ला इतिहासचं एक महत्वपूर्ण साधन आहे.तसेच पर्यटकांसाठी देखील या किल्ल्याची सफर एक उत्तम अनुभव ठरू शकतो.औरंगाबाद वरून या किल्ल्यावर जाण्यासाठी बस ,टॅक्सी तसेच खासगी वाहने उपलब्ध होऊ शकतात.

– अजय देशपांडेLoading…


Loading…

Loading...