कमी भांडवल वापरून सुरु करता येणाऱ्या ब्युटी पार्लर व्यवसायातील संधी

beauty

स्नेहल सावंत/सांगली –  आजच्या काळात देशातील स्त्रियांमध्ये त्यांच्या सौंदर्याबद्दल जाणीव विकसित होत आहे. त्यामुळे ब्युटी पार्लर हा त्यांचा गरजेचा भाग बनला आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात हा व्यवसाय लोकप्रिय झाला आहे. देशात महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सामान्य लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट होताना दिसत आहे. राहणीमानात बदल,शिक्षणाचा खर्च, औषधोपचार, इतर घरगुती खर्च, यामुळे सामान्य माणूस चिंतेत असतो.

आर्थिक उत्पन्न वाढावे हे प्रत्येकालाच वाटत असते. स्वतः साठी व कुटुंबासाठी सहकार्य म्हणून स्त्रिया वेगवेगळे व्यवसाय करू इच्छितात. त्यातील एक उपयुक्त व्यवसाय म्हणजे ‘ब्युटी पार्लर’ बदलती राहणीमान, फ़ॅशन्स, आधुनिकता त्यामुळे सौंदर्याबद्दलची जागरूकता होत आहे. त्यामुळे या व्यवसायांना महत्व प्राप्त झाले आहे. कोणत्याही वयातील कोणत्याही स्थरातील स्त्रियांना हा व्यवसाय करणं सोप जाते.

अगदी कमी भांडवल वापरून सुरुवातीला हा व्यवसाय घरच्या घरी करणे सोपे जाते. कालांतराने तो व्यवसाय वाढवता येतो. व्यवसाय छोटा असो किंवा मोठा त्याबाबत भरपूर ज्ञान असणे आवश्यक असते. त्यासाठी मार्गदर्शन देणारी ब्युटी कोर्सेस गरजेचे असतात. नवनवीन माहिती, सौन्दर्याबाबत टिप्स हि या व्यवसायात अत्यंत महत्वाची असते.

घरच्यांना मदत म्हणुन किंवा आवड म्हणून देखील हा व्यवसाय करणे महत्वाचे ठरते. आजकाल लग्नसमारंभात नवववधू मेकअपसाठी तासन तास काम करावे लागते. त्यामुळे यामागील कष्ट व वेळ याची जाणीव घरच्यांना देखील झाली पाहिजे.

हा व्यवसाय निवडताना आर्थिक बाजूसहित स्वतःचे आरोग्य व स्वभाव याचा विचार करणे करणे गरजेचे ठरते. फेशीयल बॉडी मसाज यासारख्या ट्रीटमेंटमध्ये ग्राहकांना शारीरिक व मानसिक विश्रांती आवश्यक असते. त्यामुळे त्या व्यक्तीने काम करताना अत्यंत संयमी, शांत, हसतमुख अशा वृत्तीने व्यवसाय करणे गरजेचे ठरते. या व्यवसायमुळे आजकाल भरपूर प्रमाणात स्त्रियांना फायदा होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात कोरोनामुक्त पोलीस समुपदेशकाची भूमिका बजावणार : सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे

पुणे : उपचार मिळण्यात प्रचंड अडचणी; ‘आप’चे मनपा आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

जयंत पाटील हा अत्यंत तज्ञ, बुद्धिवान आणि पंडित माणूस, पडळकरांचा जोरदार टोला

मी मुख्यमंत्र्यांवर टीका केली नाही केवळ सल्ला दिला, पृथ्वीराज चव्हाणांनी दिले स्पष्टीकरण

‘मला ३५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती,मात्र तरीही मी कॉंग्रेस सोडली नाही’