Aurangabad Violence : औरंगाबादकर का संतापलास ?

riot Aurangabad

औरंगाबाद शहर ऐतिहासिक वारसा असलेले , संस्कृतीक विविधता , चळवळीचे केंद्र असलेले शहर.बीबीचा मकबरा,औरंगाबाद लेणी,पाणचक्की, बावन्न दरवाजांची नाकेबंदी असलेले शहर, सोनेरी महल, पाण्याचे योग्य नियोजन असलेली नहर ए अंबरी इ. ऐतिहासिक वारसा लाभला आहे.तसेच शहरात हिंदू ,मुस्लिम ,शिख ,पारशी,जैन , बौद्ध ,ख्रिश्चन इ. समाजाची लोक राहतात.जगभरातून पर्यटक शहराला भेट द्यायला येत असतात.

त्याच बरोबर शहरात औद्योगिक वसाहती आल्यापासून शहर आधुनिकीकरण वाढण्यास सुरवात झाली. नव्वदच्या दशकापासुन आशियातील झपाट्याने वाढणारे शहर अशी ओळख मिरवत आहे.आगगाडी स्थानक (रेल्वे स्टेशन ) येथे औद्योगिक वसाहत आल्यानंतर चिकलठाणा,वाळूज व पंचतारांकित शेंद्रापर्यंत पसारा वाढला.आज येथिल उत्पादन जागतिक दर्जा मिळवून देत आहे. डिएमआयसी ( दिल्ली मुंबई औद्योगिक प्रकल्प ) अंतर्गत शेंद्रा – बिडकिन व आॅॅरिक सिटी ( औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी ) स्थापन होत आहे.जे देशातील पहिले हरित औद्योगिक शहर असणार आहे.समृद्धी महामार्गाचे मध्यवर्ती ठिकाण असणार , केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी परियोजनेत समावेश, कार्गो विमान वाहतूक सुरु झाली. मेक इन इंडिया व मॅॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत जागातिक कंपन्या शहरात येऊ घालत आहे. औद्योगिक जगातात एक स्वतंत्र ओळख शहर निर्माण करत आहे.

शहराला संघर्षाचा इतिहास आहे.कोणताही संघर्ष हा अस्तित्व व हक्कासाठी केला जातो .स्वतंत्र्य लढ्यापासुन निझामशाही व रझाकार यांनी केलेला छळ, त्यातूनच उभा राहीलेला हैद्राबाद मुक्ती संग्राम लढा, विद्यापीठ नामांतर लढा हे उदाहरण आहेत. शहर समाजिक चळवळीत नेहमी सक्रिय असते.अंतरराष्ट्रीय वा राष्ट्रीय पातळीवर घडलेल्या घटनेची शहर दखल घेत असते.कधी घेतलेली दखल शहराला हानिकारक ही ठरते. बाबरी मशीद पतन, तद्नंतर उसळलेली दंगल ,कानपुर येथिल बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना , नुकत्याच कोरेगाव भिमा येथे उसळलेली दंगल ,अपवाद पहिला मराठा क्रांती मोर्चा याच शहरातून निघाला म्हणजे शहर हे संवेदनशील आहे.शहराला भावना , संवेदना आहे तसेच प्रतिक्रिया देण्याचा स्वभाव आहे.जागातिकरण व औद्योगिकरणात शहर आपल्या मुळ स्वभाव टिकवून आहे.विविध धर्मिय शहरात ख्रिसमस ,दिवाळी व ईद , तसेच नामांतर दिवस, आंबेडकर जयंती उत्साहाने साजरा होते.समस्त बांधव एकमेकांना शुभेच्छा देत असतात.

राजकारणात शहराने मात्र माती खाल्ली आहे ,असे म्हटले तर वाईट वाटले तरी आपण निगरगट्ट झालो आहे .त्यामुळे उगाच कपाळावर आड्या आणु नये.

क्रमशः

– Dr.सुनिलसिंग राजपुत

3 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...