औरंगाबादकर का संतापले ? ( भाग २)

मागील काही दिवसांपासुन शहर प्रकाश झोतात आहे. असावे का नाही हवाच असते आमच्या औरंगाबादची…! शहरात सगळ मस्त चालू होत. शहरात काही अडचणी नव्हत्याच.राजकारण व प्रशासन नावाची व्यवस्था यांचा शहरावर एवढा भरवसा बसला होता की, त्यांनी ठरवले की शहराला पोलिस आयुक्त व महानगर पालिका आयुक्त यांची गरजच नाही. त्यामुळे त्यांना पुर्ण वेळ ठेवलेच नाही.तसेच राजकारणी आपल्या राजकारणात व्यस्त होते.

औरंगाबाद शहर कात टाकत आहे . कारण शहराचा नागरिक थोडा जागा झाला आहे.शहरात भेडसावणाऱ्या समस्यांचा तो जाब मागत आहे.जर अन्याय होत असेल तर तो प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत आहे.शहराचे तीन मुख्य प्रश्न आहेत.यामुळे सामान्य जनता चांगलीच संतापली आहे.पाणी,अतिक्रमण,कचरा व रस्ते तीनही प्रश्न सोडविण्याची धमक फक्त महापालिकेकडे आहे. या संतापाचा उद्रेक मिटमिटा येथे झाला.

Loading...

कचरा डेपोला नारेगाव नागरिकांनी विरोध केल्यामुळे मिटमिटा व पडेगाव येथे महापालिकेने कचरा टाकण्याचा निर्णय घेतला मात्र स्थानिक नागरिकांनी विरोध करत प्रशासनाला कोंडित पकडले. जन आंदोलन किती प्रखर होऊ शकते हे शहराने अनुभवले. येथे नागरिकांनी पोलिस प्रशासनाला जुमानले नाही.पर्यायी येथे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. लाठीचार्ज व गोळीबार ही केला. दंगल सदृश्य परिस्थिती उद्भवल्यामुळे कलम १४४ लागू केली व सोशल मिडियावर भडका उडू नये म्हणुन इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. म्हणजेच कचरा प्रश्नाला हताळताना प्रशासनाचे नाकी नऊ आले होते.

 आमचे औरंगाबाद संवेदनशील आहे

शहरात हिंदू मुस्लिम दंगल झाली.कारण अजुनही प्रशासनाला स्पष्ट कळालेले नाही.पण का झाली ही दंगल? का घडवून आणली ?? मुलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी घडाविण्यात आली अशीही चर्चा आहे.५ मे ला महापालिकेने सर्वसाधारण सभेची दखल घेत पाणीपुरवठाचे नियोजन रद्द केले,रस्ते विकास कामासाठीच्या दिडशे कोटीच्या निविदा रद्द व अतिक्रमण काढायचे ठरले.

औरंगपुरा,पैठण गेट,गुलमंडी,शहागंज,पुंडलिक नगर,गारखेडा,शिवाजी नगर ई.ठिकाणी अतिक्रमणाचा विळखा पडला आहे.मुख्य रस्त्यावर हातगाड्या लावून वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. याकडे नगरसेवक राज वानखेडे, राजेंद्र जंजाळ व विरोधी पक्ष नेता फिरोज खान यांनी लक्ष वेधले होते. मात्र अब्दुल नायकवडी ,खान व वानखेडे यांच्यात एक वाक्यता काही झाली नाही व हमरीतुमरीवर प्रसंग आला. दरम्यान सभेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी अतिक्रमण काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

कर्स झोन निश्चित करुन हातगाड्या हटविण्यासाठी नगर रचना विभाग , अतिक्रमण विभाग व मालमत्ता विभाग यांची समिती तयार करण्यात आली. प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवायला सुरवात केली. शहागंज परिसरात रमजान ईद निमित्त रस्त्यावर बाझार भरत असतो यामुळे वाहतुक कोंडी होते.तो बाझार आमखास मैदानात हलवावा असे पत्र लछू पहिलवान जे नगरसेविकेचे वडिल आहे.त्यांनी एक महिन्यापुर्वी प्रशासनाला दिले होते असे सांगतात.तसेच एका फळ विक्रेत्याने खराब फळे दिल्यामुळे जाब विचारण्यास आलेल्या ग्राहकाला विक्रेत्याने शिवीगाळ केली प्रत्युत्तरात मारहाण झाली.हे वैयक्तिक वाद होता पण याला हिंदू मुस्लिम रंग देण्यात आला. वरील गोष्टी लक्षात घेता दंगल होईल असे वाटते का?आमचा संताप इतका अनावर का झालाय.?

Aurangabad Violence : औरंगाबादकर का संतापलास ? (भाग १)

सुनिलसिंग राजपुत

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
उद्धवची आणि संज्याची औकात काढली त्याबद्दल उदयनराजेंच अभिनंदन:निलेश राणे
संज्या म्हणजे लुक्का;संज्या राऊत म्हणजे 'पिसाळलेला कुत्रा':निलेश राणे
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
'अजित पवार हे सध्याच्या मंत्रिमंडळातील अत्यंत कार्यक्षम मंत्री असून ते  कामाला वाघ आहेत'
नितेश राणेंची जीभ घसरली संजय राऊतांवर केली अश्लाघ्य भाषेत टीका
'हा देश मोदी आणि अमित शाह यांच्या बापाचा नाही'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
छत्रपतींच्या घराण्याचा अपमान सहन करणार नाही, आज सातारा बंद