मराठी सिनेसृष्टीतील उगवता तारा …नितीन बनसोडे

टीम महाराष्ट्र देशा – मराठी सिनेसृष्टीत कसदार अभिनय करणाऱ्या कलाकारांची कमतरता नाही. सोनाली कुलकर्णी (सिनियर), सुबोध भावे, प्रशांत दामले, उपेंद्र लिमये, मुक्ता बर्वे, स्वप्नील जोशी, यासारखे असंख्य स्टार्स मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. या कलाकारांच्या पावलांवर पाऊल ठेवत काही नवीन कलाकार या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. अश्या उगवत्या ताऱ्यांच्या आणि गुणी कलाकारांच्या मुलाखती ‘महाराष्ट्र देशा’ खास वाचकांच्या आग्रहाखातर घेवून येत आहे. नितीन बनसोडे या गुणी आणि उत्साही अभिनेत्याची आमचे प्रतिनिधी प्राजक्ता जोशी यांनी घेतलेली मुलाखत.

प्राजक्ता – तू इतरही क्षेत्रात करियर करू शकला असता मग या क्षेत्राकडे कसा वळला?
नितीन –मला शाळेत असल्यापासूनच नाटकात काम करण्याची इच्छा आणि आवड होती पण मार्ग माहीत नव्हता.
पुढे शिक्षण पूर्ण करून मी नोकरी केली ,खूप वेगवेगळ्या कंपनी मध्ये काम केले पण कुठेच मन नाही लागलं . आयुष्याला कोणता उद्देशच नव्हता म्हणून कुठेच मन लागलं नाही .मग माझी चेतन दातार यांचे मोठे बंधू मिलिंद दातार यांची भेट झाली . त्याच्या मार्गदर्शनाने मी महाराष्ट्र कल्चर सेंटर मध्ये काही महिने नाट्यवर्कशॉप केला. पण घराची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे नोकरी संभाळूनच आवड जोपासली आणि माझी तारे वरची कसरत चालू झाली.

पुढे माझी अभिनेता राहुल बेलापूरकरशी ओळख झाली आणि समर्थ अकॅडमी मध्ये माझा नाटकांचा प्रवास चालू झाला . एकांकिका, नाटकं , करत असताना स्वतःला तयार करण्यासाठी वेळ दिला पाहिजे हे लक्षात आलं आणि वाचन कारला लागलो लिखाणाचा पण पुढे सराव करू लागलो. त्याचे अजून प्रयत्न चालूच आहेत. दुनिया गेली तेल लावत, रामराम पाव्हन, चलाय काय, श्यामची मम्मी ,काळोखाच्या गर्भात, मंडळ आपलं आभारी आहे, झेंडा रोवला, कोरड आणि इतर नाटक आणि एकांकिके मधून काम केली, आणि आयुष्याला एक ध्येय मिळालं . याचं क्षेत्रात करियर कराच ठरवलं. पुढे नोकरी सोडून मी पूर्ण वेळ यात देऊ लागलो, पण आर्थिक परिस्थिती संभाळण्या साठी मी आसिस्टन दिग्दर्शक ,आणि प्रोडक्शन करू लागलो. हे करत असताना चित्रपटात छोटया छोट्या भूमिका पण करू लागलो . सह्याद्री वाहिणीवर काही मालिकांन मधून कॅमेऱ्यासमोरच प्रवासचालू झाला . काम करत असताना खूप चांगल्या कलाकारांनी, दिग्दर्शकांनी खूप मोलाचे मार्गदर्शन ही केले त्यासाठी त्याचे खूप आभार .

प्राजक्ता – तुझ्या घरातील कोणीही या क्षेत्रात नाही मग या क्षेत्रात येताना घरातून विरोध झाला की सपोर्ट मिळाला
?
नितीन – माझे आई वडील मुलाचे बीड जिल्हयातील मोरफली या गावाचे. 1972 च्या दुष्काळामुळे त्यांनी पुणे येथील
विश्रांतवाडी येथे रहायला आले . मोल मजुरी करून त्यांना उद्धार निर्वाह करावा लागला. माझं माध्यमिक शिक्षण हे गावीच गजानन विद्यालय लहुळ हॉस्टेलमध्ये राहून मी पूर्ण केलं . शाळेत असताना मी पाहिलं नाटक केलं तेव्हा पासूनच नाटकाची आवड निर्माण झाली आणि पुढील शिक्षण पुण्यातून केलं . या क्षेत्रात येण्याचा निर्णय मी घेतला तेव्हा घरच्यांना माहीत नव्हतं मी काय
करतोय आणि मी पण त्यांना सांगितलं नव्हतं . कारण या क्षेत्रात आजपर्यंत आमच्या घरात कोणीच काम केलं नव्हतं . त्यांना समजणं थोडं कठीण वाटत होतं . एक दिवशी त्यांना सविस्तरपणे समजावून सांगितलं . त्यावर त्यांनी मला सांगितलं की तू आता समजदार आहेस . तुझा निर्णय तू घेऊ शकतोस .आणि कोणताही निर्णय चूक किंवा बरोबर नसतो , तो आपल्याला सिध्द करायचा असतो . लोक काय म्हणतील याचा विचार करू नकोस पण जे करशील ते प्रामाणिक आणि मेहनतीने कर यश नक्की मिळेल . माझ्या अशिक्षित आई ,वडिलांच्या या शब्दावर मी स्वतःच अशिक्षित असल्याची जाणीव झाली मनोबल पण मिळालं आणि स्वतःला झोकून देऊन कमला सुरवात झाली.

प्राजक्ता – पाहिलं काम ज्यावेळी भेटलं त्यावेळी काय भावना होत्या?

नितीन – माझी कामाची सुरुवात नाटकातूनच झाली, पुढे सह्याद्री वाहिनीची ‘साता जन्माची पुण्याई’ या मालिकेतून प्रमुख भूमिकेतून काम केलं तेव्हा ही खूप आनंद झाला त्या दिवशी मला घरी जायला खूप उशीर झाला होता. घरी गेलो तेव्हा आई वडील लहान भाऊ झोपले होते, मी घरी गेलो आणि आई झोपेतच असताना पाय पडलो. आई उठली आणि काय झालं म्हणून विचारल आणि मी तिला सांगितलं मी एका मालिकेत काम करतोय, आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि आम्ही खूप वेळ गप्पा मारत बसलो. तस त्यांनी माझं या आधी नाटकातील काम पाहिलं नव्हतं म्हणून आई माझं काम बघण्यासाठी दिवस भर सह्याद्री वाहिनी बघत असायची.


प्राजक्ता – आजवर कोण-कोणत्या प्रोजेक्टवर काम केलं आहे? आणि मेमोरेबल असा कोणता प्रोजेक्ट तुला वाटतो?
नितीन – मी आज पर्यंत सह्याद्री वाहिनीवरील सात जन्माची पुण्याई, बे दुणे चार, मोस्ट वॉन्टेड, मला भेटलेली माणसं, झी मराठी वहिनी वर जुळून येती रेशीमगाठी, शौर्य, लव्ह लग्न लोचा, कलर्स वाहिनीवरील माझिया माहेर, लक्ष्मी सदैव मंगलम ,टी व्ही 9 वहिनीवर Crime File, सोनी वाहिनीवरील Crime Patrol, मराठी चित्रपट पोशिंदा, दगड बाईची चाळ, कुठे बोलू नका, हिच्यासाठी काय पण, फास्टर फेणे, लघुपट, काहूर, दाखला, काच, हिरो, silent, (हिंदी ) कटपुटली येणारी चित्रपट गोट्या गँगस्टर , राम प्रहार , वाय , (हिंदी )ठाकरे , (हिंदी ) चित्रकूट व्यावसायिक नाटकं दुनिया गेली तेल लावत, रामराम पाव्हन, चालय काय, श्याची मम्मी माझ्या लक्षात असलेले सर्वच प्रोजेक्ट आहेत. या सर्वच प्रोजेक्ट मध्ये मला मोठ्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली.

नाटकातली एक आठवण म्हणजे श्यामची मम्मी या नाटकाच्या वेळी मी जोती चांदेकर, अविनाश देशमुख दिग्दर्शन यांनी मला नाटकात काम काम करण्याची संधी दिली. तेव्हा त्यांच्या कडून खूप शिकायला मिळाले नाटकं करणे खूप कष्टाचे काम आहे. त्यांत झोकून काम केलं पाहिजे. राम प्रहर या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस सागर कारंडे, प्रियदर्शन जाधव, आनंद जोग भारत गणेशपुरे इतर… नुकताच आनंद जोग सर यांनाच सिंघम हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यांनी मला बोलावून घेतलं मी थोडा घाबरलोच, मी त्यांचा जवळ जाऊन उभा राहिलो तर त्यांनी माझ्या कामच कौतुक केलं आणि काम करत राहा मोठा होशील या शब्दात त्यांनी पाठ थोपटली खरच खूप बरं वाटलं आणि आनंद ही झाला. अशा कलाकाराच्या शब्बास की मुळे आत्मविश्वास वाढतो पुढे अशाच राजपाल यादव, सुदेश बेदी, अवतार गील, मंगेश देसाई, निर्मीती सावंत, विशाखा सुभेदार, महेश सुभेदार, भार्गवी चिरमुले, विजय चव्हाण आणि नावाजुद्दीन सिद्धीकी, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिगदर्शक राजेश पिंजानी यांच्या बरोबरही काम करण्याची संधी मिळाली.

प्राजक्ता – या क्षेत्रात आव्हाने काय आहेत?
नितीन – या क्षेत्रात आव्हाने तशी खूप आहेत. इथे मुख्य म्हणजे शॉर्ट कट नाही. इथे तीन गोष्टी नेहेमी जवळ बाळगाव्या लागतात, जिद्द, मेहनत, आणि चिकाटी. इथे तुम्ही माणूस म्हणून कसे आहेत यावर ही तुमची पारख केली जाते आणि तुम्हाला माणसंही ओळखता आली पाहिजे. आज काल खूप वाहिन्या प्रोडक्शन हाऊस आहेत. त्यात योग्य कोण आणि अयोग्य हे कळत नाही. त्यामुळे फसवणाऱ्याची संख्या खूप प्रमाणात वाढली आहे. ‘पाण्यात पडल्या शिवाय पोहता येत नाही’ अशी एक म्हण आहे ती इथे लागु होते.

प्राजक्ता – जे नव्याने या क्षेत्रात येऊ पाहतात त्यांना काय सांगशील?
नितीन – या क्षेत्रात येऊ इच्छिताना मी एव्हढाच सांगेन की, हे क्षेत्र बाहेरून खूप चकचकीत दिसत असले तरीयामध्ये खूप कष्ट आहेत. तिथे एका रात्री मध्ये कोणी स्टार होत नाही. आधी स्वतःची पारख करा तुम्ही काय करू शकता हे आधी ओळखा. योग्य प्रशिक्षण घ्या आणि मगच या क्षेत्रात येण्याचा निर्णय घ्या.

प्राजक्ता – तू जे काम करतोस हे सर्वाना ठाऊकच आहे मात्र याशिवाय तुझे छंद काय आहेत ?
नितीन – मी माझ्या छंदालाच माझा व्यवसाय केला आहे म्हणून तर मी या क्षेत्रात आज पर्यंत टिकून आहे आणि पुढे वाचनाची आवड निर्माण झाली, आता लिखाणाचा ही प्रयत्न चालू आहे शॉर्ट फिल्म लिहिण्याचा पर्यंत करत असतो. बाकी वेळेस योगा, पोहणे, क्रिकेट खेळणं, फिरला जाणे, आणि महत्त्वाचं म्हणजे चिंतन करणे.

प्राजक्ता – तुझे आदर्श ?
नितीन – मी आदर्श सर्वानाच मानतो, जे माझ्या बरोबर आहेत. मी आज प्रयन्त खूप चांगल्या कलाकाराने बरोबर काम केलं . त्या बरेच लोक माझे आदर्श आहेत आणि बाकी नवाजुद्दीन सिद्धीकी, अमिताभ बच्चन, परेश रावल, अनुराग कश्यप, राजेश पिंजनी.

प्राजक्ता – सोशल मिडीयाचा वापर वाढल्याने तुमच्या क्षेत्रावर काही परिणाम झाला आहे का ? तुम्ही स्वतः सोशल मिडीयाचा वापर कसा करता?
नितीन – सोशल मीडियाचा परिणाम तर याच क्षेत्रावर नाही तर बऱ्याच क्षेत्रात झालाय. आता ही अशी मीडिया आहे की ती सर्वांच्याच हातात आहे त्याचा वापर करणारी माणस कशी आहे यावर याचा परिणाम ठरवता येईल. आमच्या क्षेत्रात याचा चांगला परिणाम दिसून येतो. घरी बसल्या लोकांच्या संपर्कात राहत येते. नवीन गोष्टीची माहिती होते.  तुम्हाला स्वतःला अपडेट राहता येतं, आपल्यात असलेले कलागुण जागा पुढे मांडता येतात आणि तसंं पाहिलं तर कोणत्याही गोष्टीचा उदरेक केलात तर नुकसानही होत. तेव्हा सोशल मीडियाचा वापर करा पण प्रमाणात. मीही करतो माझ्या नवीन कामाची माहिती, माझे ऑडिशन, नवीन लुक मध्ये फोटो अश्या बराच गोष्टीसाठी मी सोशल मीडियाचा वापर करतो.

प्राजक्ता –तुला आजवरच्या वाटचालीसाठी, यशासाठी जर कोणाला thanks बोलायचं असेल तर कुणाला बोलशील आणि का?

नितीन – मी सर्वात पहिल्यांदा आभार मानेन तर आई वडिलांचे त्यांनी खूप समजून घेतलं मला त्या बदल. बाकी माझा समर्थ अकॅडमी टीमचंं सर्वानीच मला खूप नेहेमीच मदत केली आणि आजही करतात त्याबदल. माझे मित्र मंडळी ते ज्यांनी मला साथ दिली ते आणि ज्यांनी नाही दिली ते सुध्दा कारण ते नसते तर आज मी इथपर्यंत येण्याचा प्रवास चालूच नसता केला.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरच्या विळख्यात…

प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ‘डाॅ. हंसराज हाथी’ यांचं निधन

सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदेच्या भक्तीगीताने वारकऱ्यांचे स्वागत