पण’ती’

abortion-reuters.jpg.image.

दिवाळीचं वैशिष्ठ्य म्हणजे पणती… अंगणात, दरवाजात, खिडकीत आपण भरपूर पणत्या लावतो आणि धुमधडाक्यात दिवाळी साजरी करतो… पण अनेक घरांमध्ये हीच पणती डोळ्यात खुपते कारण ती मुलगी असते… आजही आपल्याकडे पुरूषप्रधान संस्कृती आहे… भलेही प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून चालत असल्या तरीही पुरूष नेहमीच स्त्रिच्या वरचढ राहीलाय, नेहमीच पुरूषानं आपलं पुरूषत्व सिद्ध करण्यासाठी स्त्रिला कमी लेखलंय मग ती द्रौपदी असूदेत किंवा आजची कमावणारी स्त्री… मला नेहमीच स्त्रिचं अस्तित्व धोक्यात असल्याची जाणीव होते आणि ती वारंवार होते… ही जाणीव मला माझ्या भोवताली घडणाऱ्या अनेक घटनांमुळे होते तर कधी येणाऱ्या अनुभवामुळे होते… स्त्रिनं स्वतःचं एक अस्तित्व तयार केलंय खरं ज्याची जाणीव आज जगातल्या प्रत्येकाला आहे पण हे अस्तित्व तयार करत असतांना तिला वारंवार अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

abortion-reuters.jpg.image.975.568

स्त्री ही जन्मदात्री आहे, ती क्रीएटीव्ह आहे कारण ती हाडामासाचा माणूस तयार करू शकते… आपण तीला मॅन्युफॅक्चरर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही… कारण तीच्याचमुळे आपण हे जग पाहतो हे कसं विसरून चालेल… नऊ महिने एका बाळाला ती आपल्या गोर्भात वाढवते… नऊ महिने ती तिच्या बाळासाठी आपला आहार बदलते… आपल्या बाळासाठी ती ते सगळं करते जे त्या बाळाच्या पोषणासाठी गरजेचं असतं मग त्यामुळे तिचं वजन वाढलं तरी तिला त्याचं वाईट वाटत नाही… गर्भावस्थेत तीच्या पोटावर बेढब स्ट्रेचमार्क्स येतात… पण तरीही ती स्त्री आपल्या बाळाला हसतमुखानं स्वतःमध्ये वाढवते… आणि या सगळ्या नऊ महिन्यांच्या प्रोसेसनंतर जेव्हा ती स्त्री आपल्या बाळाला जन्म देते तेव्हा सगळं वातावरण खूप आनंदीत झालेलं असतं… पण या सगळ्याची जाणीव काहीच लोकांना असते याची खंत वाटते… वाईट वाटतं आणि खूप प्रमाणात त्रास होतो… तर काहींच्या बाबतीत गर्भातच मुलींना मारून टाकलं जातं… त्या स्त्री अर्भकाला आईच्या गर्भातच चुरगळलं जातं, उमलणाऱ्या त्या नाजूकशा कळीला कुसकरलं जातं… हे सगळं लिहीतांना जितका त्रास होतोय तितकाच हे सगळं ऐकलं की त्रास होतो… हे सगळं फार घृणास्पद आहे… खरं तर अशा लोकांना जगण्याचा अजिबात अधिकार नाहीये… कारण हे लोकं हत्यारे आहेत…एका निष्पाप जीवाचा हे लोकं खून करतात… हे सगळं लिहीत असतांना मला सांगलीच्या म्हैसाळ गावातल्या खिद्रापुरेचं प्रकरण आठवलं… मी अँकरींग करत होते, आणि अचानक एक ब्रेकींग न्यूज आली… सांगलीतल्या म्हैसाळ गावात मोठ्या प्रमाणात अवैध गर्भपाताचं रॅकेट उघडकीस आलं… जवळपास नऊ वर्षांपासून हा खिद्रापुरे गर्भलिंगनिदान चाचण्या करून अवैधपणे गर्भपात करत होता… हे सगळं प्रेक्षकांना सांगताना अंगावर काटा उभा राहात होता…कारण हे फार भीषण होतं… विचीत्र होतं आणि विकृत होतं… नऊ वर्षांपेक्षा जास्त एखादा माणूस एक रूग्णालय चालवतोय जीथं तो हे अवैध प्रकार करतोय हे कुणाच्याच लक्षात येऊ नये… याला फक्त प्रशासन नाही तर समाजही तितकाच जबाबदार आहे… गेल्या नऊ वर्षात या खिद्रापुरेनं हजारो स्त्री अर्भक मारली असतील त्याचा हिशोबही करणं अवघड आहे… या खिद्रापुरेला डॉक्टर काय प्राणीही म्हणता येणार नाही… मला वाटतं जितका हा खिद्रापुरे या सगळ्याला जबाबदार आहे तितकेच त्याच्याकडे गर्भपातासाठी जाणारा समाज जबाबदार आहे…

dr.khidrapure

या घटनांमुळे एकच लक्षात येतं की आपला समाजाला कीड लागलीये… आपला समाज या किडीमुळे पोखरत चाललांय… समाजाची अधोगती सुरू झालीये… पत्त्याच्या पानांसारखा हा समाज एका दरीत कोसळतोय…
एकवीसाव्या शतकात आपण गर्भलिंगनिदान चाचण्या करून मुलींना मारून टाकतोय, आणि म्हणे आपण प्रगती करतोय… मुलींना मारून प्रगती होत नसते तर अधोगती होते…

आजही अनेक घरांमध्ये मुलगी जन्माला आली महणून नाकं मुरडली जातात… मी विचारते का, कशासाठी… जी सासू आपल्या सुनेचा मुलाच्या हव्यासापोटी छळ करते ती हे विसरते की ती स्वतः एक स्त्री आहे… कीव करावीशी वाटते अशा विचारांच्या लोकांची… यामुळे अनेक स्त्रियांना आई होण्याचं सुख अनुभवताच येत नाही कारण घरच्यांना मुलगा हवा असतो… एका आईच्या बाळाची जेव्हा तुम्ही तिच्या गर्भात हत्या करता तेव्हा तीच्या मनात काय वादळ उठलेलं असतं याचा कणभरही अंदाज तुम्ही बांधू शकत नाही… स्त्री मनानं घट्ट असली तरी ती आई झाल्यावर मात्र मऊ होते… तीच्या भावना थोड्याही दुखवल्या गेल्या तर ती रडू लागते… पण इथे तर तुम्ही तीचं मूलच मारून टाकता… तीचं काय होत असेल याचा थोडा विचार करा… तीचं मूल मारण्याला फक्त तीच्या सासरचे जबाबदार नसतात तर हा समाज जबाबदार असतो…

समाज जसा चांगला असतो तसा वाईटही असतो… स्त्रीला डावलण्याचं काम हाच समाज करतो… हाच समाज तीचं जगणं कठीण करतो… आपल्या देशात अनेक ठिकाणी मिनिटा-मिनिटाला बलात्कार होतायत, स्त्रीची आब्रूच नाही तर ती स्त्री संपूर्णपणे या बलात्कारामुळे पोखरून निघते… देशाची राजधानी दिल्लीमधलं निर्भया प्रकरण आजही मनावर तितकेच ओरखडे आणतं… पण आपल्याला फक्त दिल्लीची निर्भया माहितीये… आपल्या घराशेजारी देखील अशी एखादी निर्भया असू शकते… आपल्या घरातही अशी एखादी निर्भया असू शकते… कारण घरातलेच पुरूष स्त्रियांचं सर्वात जास्त शोषण करतात… आपल्या घरातल्या लहान मुलींचं शोषण तर होत नाहीये ना याची काळजी घेण्याची हीच वेळ आहे…

प्रत्येक स्त्रिला स्वतःवर अधिकार आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे… प्रत्येक स्त्रिला नाही म्हणायचा अधिकार आहे… सेक्स करायचा की नाही हा अधिकार देखील स्त्रिला आहे… कोणते कपडे परिधान करायचे, कसं जगायचं हा अधिकारही स्त्रिला आहे… हे सगळे अधिकार जसे पुरूषांना आहेत तसेच अगदी तसेच स्त्रिला देखील आहे…
या सगळ्या गोष्टी आपण जगत असताना फार महत्त्वाच्या ठरतात, आपण जे जगत असतो त्यात मोठा वाटा असतो आपल्यावर झालेल्या  संस्कारांचा, चांगल्या सवयींचा… चांगले विचारच हे सगळं चित्र बदलू शकतात… त्यामुळे प्रत्येक आईनं म्हणजेच प्रत्येक स्त्रिनं आपल्या बाळावर विशेषतः मुलावर हे संयमी संस्कार घालणं महत्त्वाचं आहे… जर प्रत्येक मुलगा आपल्या विचारांनी चांगला झाला तर आणि तरच प्रत्येक पुरूष चांगला होईल

सुप्रिया कुऱ्हाडे – नरखेडकर
News Presenter &  Producer IBN Lokmat
Loading...