हम चाँद पे,रोटी की चादर डाल कर सो जाएँगे…

1986 ला NSD मधून पदवीधर होऊन बाहेर पडल्यावर पीयूषने NSD रेपर्टरी मध्ये नोकरीही केली पण त्यात तो फार रमलाच नाही केवळ 18दिवसांत त्याने ती नोकरी सोडली. त्याकाळी म्हणजे 1986ला रुपये 4000/- असा बक्कळ पगार असलेली चांगली नोकरी सोडून त्याने दिल्लीमध्ये नाट्यअभिनेता म्हणून काम सुरु केलं आणि 4वर्षें म्हणजे 1990पर्यंत ते काम करुन 1990मध्ये स्थापन झालेल्या एन् के शर्मा या दिग्दर्शकाच्या Act 0ne यानाट्यसमूहात तो सामील होऊन एन् के शर्मा सारखा एक तैय्यार दिग्दर्शक आणि मनोज बाजपेयी आशीष विद्यार्थी गजराज राव आदि अत्यंत गुणी सहकलाकारांसोबत  तो काम करुं लागला.हाच तो काळ ज्यावेळी पीयूषवर एन् के शर्मां चा खूप प्रभाव पडला. शर्मा ही पीयूषला हवं ते करायला स्वातंत्र्य देणारी पहिली व्यक्ती त्यामुळे त्यांना तो पितृतुल्य मानायचा.

Act 0ne या त्यांच्या नाट्यसमूहात पीयूषने नाटकं बसवणे, संगीत देणे, कविता लिहणे,अभिनय करणे आणि नाटकासाठी हवं ते सगळं केलं. यामुळेअगदी सहजी पीयूष एन् के च्या उपकाराखाली दबला गेला. एन् के हा एक डाव्या विचारसरणीचा आणि नास्तिक माणूस होता आणि त्याचा खूप जास्त प्रभाव यादरम्यान पीयूष वर असल्याने पीयूष देखील स्वतःला त्याच्याशी मॅच करु पाहत होता. प्रथमपासून अगदी आस्तिक असणारा पीयूष पण एन् के चा जबरदस्त पगडा पडल्याने स्वतःला
नास्तिक मानू लागला. त्याने स्वतःवर एन् के चा मुखवटा(डावी विचारसरणी आणि नास्तिकता) चढवला आणि त्याखाली तो वावरु लागला. Act 0ne मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे पीयूष मधील सृजनता जागृत होऊन त्याच्यातील प्रतिभा ही एखाद्या धबधब्याप्रमाणे कोसळत होती. थिएटरमुळे पीयूष आता सर्वश्रृत झाला होता आणि मग अंगचीच प्रचंड संवेदनशीलता, गत आयुष्याबद्दलचा न्यूनगंड आणि बळजबरी ओढलेला एन् के चा मुखवटा यासर्वांसोबत कधी कोणास ठावूक पण हळुवारपणे, अगदी दबक्या पावलांनी पीयूषच्या आयुष्यात दारुने प्रवेश केला या सगळ्या मिलाफामुळे या काळात त्याची प्रचंड मानसिक ओढाताण झाली आणि या सर्वांचा परिपाक म्हणूनच की काय एक दिवस पीयूष नामक ज्वालामुखीचा उद्रेक होऊन एन् के शर्मा शी त्याचे जबरदस्त खटके उडाले आणित्याने Act 0ne Group सोडला.

Loading...

mishra

इन्सान ख़ुद की नज़र में सही होना चाहिए.. क्योंकी,दुनियाँ तो भगवान से भी दुखी हैं..!

पीयूष कडे स्त्रिया या नेहमीच आकर्षित होत असत.अशीच त्याच्या कलागुणांवर भाळलेली, श्रीमंत घरातील आणि स्वतः आर्किटेक्ट असणारी प्रिया ही पीयूष च्या आयुष्यात आली होती. पीयूष ने प्रिया शी लग्न केलं होतं. पूर्वी 10वीत असताना ग्वाल्हेरच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात जाऊन अॅफेडेव्हिट करुन स्वतःचं नाव बदलून घेणारा पीयूष लग्नानंतर एका अर्थी त्याच्या मूळ नावांत परत आला प्रियाकांत म्हणजे प्रियाचा नवरा आता तो फक्त नावाने नाही तर खरोखर एका प्रियाचा नावाच्या स्त्री चा नवरा होता.Act 0ne सोडल्यानंतर पीयूष पोरका झाला. हाताशी काम नव्हतं. कौटुंबिक जवाबदारी होती शिवाय दारुलाही पैसे हवे होते. प्रिया नोकरी करत असली तरी तिचा पगार पुरेसा नव्हता अशात पीयूषने 1996त दिल्लीमध्येच अस्मितानावाचा नाट्यसमूह जाॅईन केला आणि त्यात-An Evening With _Piyush Mishra या नावानेSolo Performance Shows करुं लागला. त्याचे शोज् तुफान लोकप्रिय झाले. पीयूष करतोय म्हणजे नक्कीच काहीतरी दर्जेदार असणार या खात्रीने लोक त्याला गर्दी करत.त्याच्या या खेळांची तिकिटं अगदी ब्लॅकमध्ये विकली जायची. रसिकांकडून एवढा भरभरुन प्रतिसाद मिळणारे नाट्यकलावंत तसे विरळाच. पुढे 4/2 वर्षें पीयूष नेअस्मिता मध्ये अनेक भूमिका केल्या.

दरम्यानच्या काळात पीयूष चे अनेक सहकारी मुंबईला जाऊन बाॅलिवूडमध्येसेट्ल झाले होते पण पीयूष चा पाय दिल्लीमधून निघत नव्हता. NSD तून पदवी घेतल्या घेतल्या पीयूष ने मुंबईला जाऊन श्याम बेनेगल दूरदर्शनसाठी करत असलेल्या भारत-एक खोज(1988) तिग्मांशू धुलियाँ स्टार टिव्हीसाठी करत असलेल्या राजधानी(1989) आणि एक हाॅरर टिव्ही सीरिज किले का रहस्य(1989) मध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या पण मुंबईत राहून स्ट्रगल कसं करतात हे माहित नसल्यामुळे तो दिल्लीला परत आला पण अस्मिता मध्ये 4/2वर्षें काम केल्यानंतर तो परत एकदा मुंबईला आला. पुन्हा एकदा तिग्मांशू धुलियाँ मुळेच त्याला च्या दिल से(1998) मध्ये काम मिळालं आणि पीयूष ने आपल्या चित्रपटातील अभिनयाचा श्रीगणेशा केला पण यावेळीही मुंबईत करमेना म्हणून तो परत दिल्लीला आला.

पियुष

आता दारुबरोबरंच पीयूष च्या आयुष्यात स्त्रियादेखीलआल्या. प्रिया च्या नकळतंच पीयूष ने अनैतिकतेलाआपल्या घराची वाट मोकळी करुन दिली. या सर्वांचापरिणाम म्हणजे पीयूष च्या घरावर आर्थिक दिवाळखोरी कोसळली आता मात्र पीयूष वर भाळून, आपलं श्रीमंत घर सोडून आलेल्या प्रियाने पीयूष ला त्याच्या मनाविरुद्ध नशामुक्ती केंद्रात भरती केलं. तिथे मात्र खरोखर त्याला आत्मपरीक्षणासाठी भरपूर वेळ मिळाला. स्वतःमधील दोषनीटपणे कळून चुकले. अंगामधील मुजोरी कमी झाली. धरसोड वृत्ती सुटली. मनाची संभ्रमावस्था संपली. दारुच्या आहारी गेलेला पीयूष त्या व्यसनांतून कायमचा मुक्त झाला.पुन्हा कधीही दारुला स्पर्श करणार नाही ही पक्की खूणगाठ
त्याने मनाशी बांधली. त्याच्या पूर्वीच्या वागण्यामुळे ज्यांची ज्यांची मनं दुखावली गेली आहेत अशा सर्वांची माफी मागण्याचा निर्णय त्याने घेतला आणि मग सर्वप्रथम त्याची पत्नीपासून सुरुवात करुन अगदी एन् के शर्मा आणि अश्या कित्येकजणांची त्याने मनापासून माफी मागितली. अशाप्रकारे पश्चात्तापाच्याअग्नीमध्ये तावून सुलाखून निघालेल्या पीयूष ने आता त्याच्या करिअरची भरकटलेली गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

पीयूष पुन्हा एकदा मुंबईच्या वारीला आला पण यावेळी मागील वेळेसारखं पळून जाण्यासाठी नव्हे तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी. यावेळी त्याला मदतीचा हात देण्यासाठी त्याचे जुने जाणते सहकारी विशाल भारद्वाज, मनोज बाजपेयी, शूजीत सरकार, अनुराग कश्यप हे सर्वजणअगदी तयार होते कारण त्यांना या अवलियाची प्रतिभा चांगली ठावूक होती. शूजीत सरकार ने पीयूष कडून यहाँ नावाचा सिनेमा लिहून घेतला. विशाल भारद्वाज ने त्याच्या मक्बूल या सिनेमात पीयूष ला एक अत्यंत चांगली भूमिका देवून जगाला त्याची ओळख करुन दिली.अनुराग कश्यप ने तर आपल्या गुलाल या चित्रपटातील गीत, संगीत, गायन आणि अभिनय त्याच्याकडून करवून घेऊन त्याचे बाॅलिवूडमधील स्थान पक्के करुन टाकले आणि मग अशाप्रकारे असुरक्षिततेच्या गर्तेत खोलवर पडलेल्या पीयूष मिश्रा नामक गरुडाने आकाशात उंचच उंच भरारी घेतली.

piyush-mishra

1994मध्ये जेव्हा तो Act 0ne Group साठी कार्यरत होता तेव्हा त्याने क्रांतिकारक सरदार भगतसिंह संधू यांच्यावर आधारित गगन दमामा(रणवाद्य)बाज्यो (_The Sky Resounds With The Call To Arms) नावाचं एक नाटक बसवलं होतं त्याचा फायदा पीयूष ला
2001मध्ये राजकुमार संतोषीं नी जेव्हा त्याच्याकडून द लेजेंड ऑफ भगत सिंह चेपटकथा आणि संवाद लिहून घेतले तेव्हा त्यासाठी पीयूष ला 2003 चा Best Dialogue Writer चा Zee Cine Awards हा मानाचा पुरस्कार देखील मिळाला. यानंतरचं पीयूषने बाॅलिवूडमध्ये _Actor, Lyricist, Music Composer, Singer,Screen Plays & Dialogue Writer, Script Writer म्हणून आपले आपलं असं एक भक्कम स्थान निर्माण केलं.पीयूष हा आत्मघातकी व्यक्तिमत्वाचा (Self Distructive Personality) चा माणूस आहे. स्वतःला उद्ध्वस्त करुन दाखविण्यात त्याला एक वेगळाच आनंद मिळत असावा बहुतेक. त्याच्या प्रत्येक कलाविष्कारातून तो ही गोष्ट साध्य करुन दाखवतो.

पियुष मिश्रा चे काही गाजलेले चित्रपट 
दिल से ,मातृभूमी , मकबूल , गुलाल , पिंक,गैंग्स ऑफ वासेपुर इत्यादी

याशिवाय पियुष ने इतरही अनेक Key Rolesअत्यंत सफाईदारपणे वठवले आहेत त्याने पटकथा ,संवाद लेखन केलेले चित्रपट 
द लेजेंड ऑफ भगत सिंह,गजनी ,१९७१,लाहोर,अग्निपथ इत्यादी

पियुष मिश्राची काही लोकप्रिय गाणी
आरंभ है प्रचंड ,ओ हुस्ना ,एक बगल में,बरगद के पेडो

पुरस्कार
Zee Cine Awards- Best Dialogue- The Legend Of Bhagat Singh (2003),

Stardust Award- Stardust Performance By A Music Director- Gulaal (2010),

Julien Dubuque International Film Festival- Best Actor- The Play Back Singer (2014).आणि बरेच …

अशाप्रकारे शेवटी काय तर चित्रपट, नाटक, अभिनय या संबंधाने ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या त्या सर्व गोष्टी पीयूष मिश्रा ने करुन पाहिल्या आणि त्या प्रत्येक भूमिकेत
त्याने स्वतःला सिद्ध करत अमाप यश मिळवले त्यामुळे पीयूष चा उल्लेख A Multifaceted Personality असा केल्यास वावगे ठरणार नाही तर अशा या बहुआयामी प्रतिभावान अवलियास त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देवून माझ्या या लेखनप्रपंचास पूर्णविराम देतो…!

_युवा कीर्तनकार_
ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी (बीड/महाराष्ट्र)

पीयूष मिश्रा-एक अष्टपैलू रंगकर्मी (भाग १)

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली