हटके करीयर, भरपूर पैसा आणि साहसपूर्ण आयुष्य जगायचं तर ‘मर्चंट नेव्ही’ला पर्याय नाही

सध्या तरुणांमध्ये धाडसी करिअर निवडण्याचं प्रमाण वाढलं आहे. जगभर भ्रमंती, भरपूर सुट्टया, तरुण वयात सर्वाधिक वेतन कमावण्याची संधी हवी असेल तर मर्चंट नेव्हीमध्ये करिअर करण्याला पर्याय नाही. ‘मर्चंट नेव्ही’ हे सागरामार्गे होणा-या व्यापारी मालवाहतूकीशी संबंधित करिअर आहे. या मालवाहतुकीचं माध्यम म्हणजे जहाज, जहाजावर विविध प्रकारची कामे करणा-या कुशल मनुष्यबळाची गरज असते. आव्हानांनी भरलेले साहसपूर्ण आयुष्य आणि त्याचबरोबर आकर्षक वेतन व उच्च राहणीमान देणारे असे हे ‘मर्चंट नेव्ही’चे क्षेत्र आहे.

या नोकरीत प्रामुख्याने मालवाहू बोटीचा संबंध येतो. काही वेळा प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बोटींचेही व्यवस्थापन करता येते. या क्षेत्रात पदवीधरांना नेव्हिगेशन ऑफिसर, रेडिओ ऑफिसर्स आणि मरीन इंजिनिअर्स अशा नोकऱ्या मिळू शकतात. पण शिपिंग कंपन्या त्यांना कराराने नोकऱ्या देत असतात. हा करार सहा ते नऊ महिन्यांचा असतो.

Loading...

तरुणांना रोजगाराची हि नवीन संधी मास्टर सीज मेरिटाईम अॅकॅडमी ‘ उपलब्ध करून देत आहे . मास्टर सीज मेरिटाईम अॅकॅडमी ‘ ही मर्चंट नेव्हीचे शिक्षण देणारी सरकारमान्य संस्था आहे .२०११ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली असून आतापर्यंत हजारो विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेवून ‘वेल सेटल’ झाले आहेत. या संस्थेची दोन मुख्यालये असून एक दिल्ली तर दुसरे पुण्यात कॅम्प परिसरात आहे. ज्याला युद्धाचा अनुभव नको आहे पण नाविक दलाशी संबंधित नोकरी करायची असेल अशा धाडशी तरुणांसाठी मर्चंट नेव्ही हे एक चांगले क्षेत्र आहे. या नोकरीत जग पाहता येते आणि अनेक धाडसी मोहिमा आखता येतात.

१) नौकानयन विभाग (नॉटिकल/ डेक विभाग)

२) इंजिन विभाग

दोन्ही विभागात जाण्यासाठी १२वी नंतर खालील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. मर्चंट नेव्हीतील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी १२ वी विज्ञानशाखेमधून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित विषयात सरासरी ६० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. तसेच इंग्रजीमध्ये ५० गुण आवश्यक आहेत.

१) नौकानयन विभागातील अभ्यासक्रम

  • डि.एन.एस. लिडींग टू बी.एस्सी. नॉटिकल सायन्स
  • बी.एस्सी. नॉटिकल सायन्स
  • बी.एस्सी.मॅरिटाईम सायन्स

२) मरिन इंजिनीयरिंग अभ्यासक्रम

३) बी.टेक.(मरिन इंजिनीयरिंग),जनरल पर्पज रेटिंग

वरील अभ्यासक्रमांना प्रवेश आय.एम.यू.- सी.ई.टी. मार्फत दिला जातो. भारत सरकारने मर्चंट नेव्हीमधील अभ्यासक्रमांचे संचालन करण्यासाठी इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटीची (आय.एम.यू ) स्थापना केली आहे.

आवश्यक पात्रता 

  • र्मचट नेव्हीमध्ये काम करण्यासाठी बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे तीन विषय अभ्यासाला असणे गरजेचे आहे. यासाठीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून प्रवेश मिळतो. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर स्क्रीिनग आणि मुख्य लेखी परीक्षाही उत्तीर्ण करावी लागते.
  • उमेदवाराला नोकरीसाठी अर्ज करण्याआधी जहाज प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. हे प्रशिक्षण अल्प कालावधीसाठी असते. यामध्ये उमेदवाराला प्राथमिक सुरक्षा उपायांचेही प्रशिक्षण दिले जाते.
  • परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुलाखत, वैद्यकीय चाचणी, दृष्टीची चाचणी पूर्ण करावी लागते.
  • उमेदवारांना पोहण्याचे किमान ज्ञान असणे आवश्यक आहे.

रोजगार संधी –
नौकानयन विभागामध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर विविध शिपिंग कंपन्यांमध्ये थर्ड ऑफिसर म्हणून नोकरी मिळते. अगदी 18 व्या वर्षापासूनच गलेलठ्ठ वेतन देणाऱ्या काही मोठय़ा क्षेत्रांमध्ये र्मचट नेव्ही या क्षेत्राचा समावेश होतो. यामध्ये दरमहा १२ हजार रुपयांपासून आठ लाख रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते. या वेतनात कंपनीनुसार, शहरांनुसार, आयात-निर्यातीच्या गरजेनुसार तफावत असते. सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना जहाजावर जेवण विनामूल्य उपलब्ध असते. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या पत्नीला एखाद्या वेळी सोबत नेण्याची संधीही मिळते.

परदेशी कंपन्यांमध्ये नोकरी मिळाल्यावर आपल्याला त्यांच्या चलनानुसार वेतन मिळते. यामुळे वेतनमूल्य साहजिकच वाढते. तसेच प्रत्यक्षात नोकरीच्या ठिकाणी फारसा दैनंदिन खर्च नसल्यामुळे वेतनातील बहुतांश रक्कम सुरक्षित राहते. याशिवाय अनेक परदेशी उंची वस्तू जहाजावर डय़ुटी फ्री उपलब्ध असतात. दरवर्षी चार महिन्यांची रजा मिळते. काही कंपन्यांमध्ये तीन महिन्यांच्या प्रवासानंतर कर्मचाऱ्यांना एक महिना रजा देण्यात येते.

साहसी जीवनाची आवड असेल आणि सागरी लाटांवर स्वार होण्याची इच्छा असेल तर तुम्ही ‘र्मचट नेव्ही’ या क्षेत्राचा करिअर म्हणून जरूर विचार करा. अधिक माहितीसाठी तुम्ही www.masterseas.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता किंवा आमच्या या 02048602402,9881933337, 9765910514 संपर्क क्रमांकावर कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
आता सुप्रिया ताईंना 'सेल्फी विथ खड्डे'चा विसर पडला आहे का?