औरंगाबादेत दंगल करण्याचे ‘नेक’ इरादे पोलिसांनी केले ‘फेल’

औरंगाबाद/अभय निकाळजे : औरंगाबाद शहारावर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ‘दंगल’ हा फंडा शोधून काढला आहे. त्यात शिवसेना आणि एमआयएम उघडपणे मैदानात आहेत, तर भाजपसारखे पक्ष पडद्यामागचे सुत्रधार आहेत. पण या राजकीय नेत्यांच्या या दंगलीच्या ‘फंड्याला’ गेल्या चार वर्षात पोलिसांनी ‘फेल’ केले आहे. त्यामुळेच आपल्या मर्जीचा पोलिस आयुक्त पाहीजे, म्हणून भाजप आणि शिवसेनेचे नेते हटून बसले आहेत.

गेल्या 30 वर्षाच्या काळात शिवसेनेने एक ‘फंडा’ फिक्स करून टाकला आहे. तो म्हणजे प्रत्येक निवडणूकीच्या आधी औरंगाबादेत धार्मिक तणाव निर्माण करायचा आणि त्यातून घाबरलेले आणि स्वतःला हिंदू म्हणविण्याचा अभिमान तणावग्रस्त परिस्थितीत घराच्या खिडकीत बसून मिळणाऱ्यांना हाताशी धरले की निवडणूका जिंकता येतात. म्हणून मग कारण कोणतेही असो शिवसेना नेत्यांचा हा फंडा इतर कुठे नाही, पण औरंगाबादेत यशस्वी होतो आणि होईलही. कारण विखारी प्रचारा करण्यात शिवसेनेचा हात कुणी धरू शकत नाही अगदी भाजपाही.

गेल्या शनिवारी औरंगाबादेत जो तणाव होता. त्यावेळी जे सेना नेते सीसीटिव्ही फुटेजमध्ये तोडफोड करणारे दिसतात, ते म्हणे पोलिसांच्या रक्षणासाठी तिथे गेले होते. तर वस्तुस्थिती अशी आहे, की एका शुल्लक कारणाचा एवढा बाऊ होऊ शकतो, याचा अंदाज तिथे असणाऱ्या आणि पोलिसांना आला नाही. कारण त्यांच्या अंदाजानुसार शिवसेनेत आता एकही असा नेताशिल्लक नाही, असे वाटले. म्हणून एका गटाने दूसऱ्यांचे जी दुकाने रिकामी व्हावीत, म्हणून एकादा लावला होता. ती जाळून टाकली. पण या हिंदूंच्या रक्षणकर्त्यांना एकही शस्त्र हल्ला करण्यासाठी मिळाले नाही. पण शस्त्र मिळाले असते तरी त्यांनी कुणावर हल्ला केला असता. कारण दूसरा गट किंवा कुणी समोर तर यायला पाहिजे होते ना, तशी परिस्थितीच नव्हती. म्हणुन शहर पाठवण्याच्या त्यांचा ‘फंडा’ फेल गेला.

पहिला किस्सा
बरोब्बर चार वर्षापुर्वी एका सिंधी मुलीनी एक मुस्लिम तरुणाशी लग्न केले होते. त्याच दिवशी अपक्ष आमदार प्रदिप जैस्वाल यांनी शिवसेनेत पुर्नप्रवेश केला होता. त्यामुळे त्या ऐतिहासिक राजकीय घटनेचे साक्षीदार होण्यासाठी हे तथाकथित हिंदू रक्षणकर्ते गेले होते. पण हे राजकीय नाट्य ‘ज्याने’ घडवून आणले होते, ते मात्र औरंगाबादेत ठाण मांडून बसले होते. ते औरंगाबादेत कसे? याचा शोध घेण्यासाठी भर दुपारी त्यांच्या ‘बालेकिल्ल्यातील’ कार्यालयात पोहोचला होता. त्याचवेळी ही बातमी येऊन धडकली. तेव्हा बातमी सांगणारा अपक्ष नगरसेवक आता ‘त्या’ नेत्यासोबत भाजपवाला झाला आहे. तर त्या नेत्याने त्याला उत्तर दिले, अरे रात्रीच मला हे प्रकरण माहीत झाले. मी त्या मुलीला एकदा नाही तर हजारदा विचारले, तर ही ती त्या पोराला सोडायला तयार नाही. त्यामुळे त्या भानगडीत तु पण पडू नकोस. हे सांगणारे नेते तेव्हा हिंदू रक्षणकर्त्याच्या सोबत होते. पण लोकांची गर्दी जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या भोवती वाढत होती. तणाव वाढत होता पोलिसांनी त्या मुलाला (मुस्लिम असणाऱ्या मुलाला कोणाच्याही संरक्षणाशिवाय पोलिस ठाण्यात सुरक्षित ठेवले) होते. संध्याकाळ होत आली होते. प्रदिप जैस्वाल यांचा पुर्नप्रवेश सोहळा आटोपला होता. तथाकथित हिंदू रक्षणकर्ते नेते परतीच्या मार्गावर होते. त्यांचेही या शहरातील घटनेवर बारीक लक्ष होते. त्यामुळे त्यांनी परतीच्या प्रवासातच ‘दंगली’चा प्लॅन आखला. त्यासाठी शहरभरातील कार्यकर्त्यांना कामाला लावले. याची कुणकुण पोलिसांना लागली होती. म्हणून त्यांनी त्या दांम्पत्याला पोलिस ठाण्यातून सुरक्षित ठिकाणी नेले आणि हे नेते पोहोचण्यापुर्वीच तगडा बंदोबस्त ठेवला.

हे नेते पांढऱ्या फाॅच्युर्नरमधून आल्या-आल्या त्यांनी पोलिस पाण्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कारण परिस्थिती त्यांच्यासाठी पुरक होती. जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या लगतची वसाहत मुस्लिम बहूल आहे. म्हणून जर त्या मुलाला थोडी धक्काबुक्की केली तरी ‘दंगल’ भडकणार होती. पण पोलिसांनी या सगळ्या रक्षणकर्त्यांच्या पार्श्वभागावर एसआरपीने लाठीमार केला. म्हणून तिथून हे नेते ××× ला पाय लावुन पळून गेले. इथे पोलिसांनी प्रकरण मिटले म्हणुन सोडून दिले नाही तर त्यांनी ‘इंटेलिजन्स कलेक्ट’ करीत ठेवला.

दूसऱ्याच दिवशी शिवसेनेने या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढला. त्या मोर्चात त्या मुलीच्या वडिलांनी पोलिसांना निवेदन देण्यापूर्वीच विष प्यायचे असे ठरवले होते. त्याची माहिती पोलिसांना झालेली होती. म्हणून त्यांनी पब्लिकमधल्याच लोकांना त्या मुलीच्या वडिलांच्या आजूबाजूला ठेवले होते. मोर्चा व्यवस्थित पोलिस आयुक्तालयावर पोहोचला. तेव्हा पोलिसांनी त्या मुलीच्या वडिलांना घेरून ठेवले होते. तिथे एकाच घटनेत दूसऱ्यांदा ‘दंगली’चा गेम पोलिसांनी ‘फेल’ केला.

त्यापूर्वीचा एक प्रकार
औरंगाबाद मध्य विधान सभा मतदार संघातील उमेदवारी देण्यावरून नाराज झालेल्या प्रदिप जैस्वाल यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेचे विकास जैन यांचा पराभव करीत दलित-मुस्लिमांच्या मतांच्या जोरावर प्रदिप जैस्वाल विजयी झाले. त्यातील काही मते आपल्या पडली असती तर जैस्वालांचा पराभव करू शकलो असतो, असा व्यापारीवृत्तीचा विचार करणाऱ्या नेत्याने आणखी एका ‘दंगली’चा प्लॅन केला होता. शहरात होणाऱ्या आंबेडकर जयंतीच्या मिरवणूकीत भगवा रंगाची उधळण करणारी एक जीप घूसवायची. पण ती माहितीही पोलिसांना मिळाल्यामुळे ती जीप मिरवणुकीपर्यत येण्यापूर्वीच पोलिसांनी पकडली. तेव्हा ही पोलिसांनी यांचा ‘दंगली’ गेम फेल केला.
या सगळ्या प्रकरणांची नोंद पोलिसदप्तरी आहे. त्या नोंदींच्या आधारे ही माहिती दिली आहे. अद्याप शहरातील प्रस्थापित क्राईम रिपोर्टर तिथपर्य॔त पोहोचलेले नाहीत.

आत्ता कश्यासाठी तणाव?
विधानसभा निवडणुकीला साधारणतः 15 ते 16 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. भाजप- शिवसेना एकत्रित लढतील, अशी शक्यता नाही. जर विभक्त होऊन लढले तर पुन्हा तिसऱ्याचे फावणार आहे. म्हणून आत्तापासूनच आप-आपली ‘वोट बँक फिक्स’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण अशा पद्धतीने तणाव निर्माण केला तर हिंदू मते एकवटून मतदान करतील की नाही, हे सांगता येत नाही. पण मुस्लिमांची मते मात्र एकवटली, हे निश्चित. म्हणून तणाव निर्माण करून आता राजकीय पोळी भाजून घेता येईल, याची सुतरामही शक्यता नाही. म्हणून तणाव निर्माण केल्याने झालेच तर व्यापाऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे नुकसानच होणार आहे.