fbpx

आर्टिकल 370 वर चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांंमध्ये चढाओढ

टीम महाराष्ट्र देशा : नुकतेच सरकारने कलम 370 हे रद्द केले. यामुळे आता काश्मीर मध्ये देखील भारतीय संविधान लागू होणार आहे. आता आपल्या देशात एकूण २८ राज्य आहेत. हा निर्णय आपल्या देशासाठी एक ऐतिहासीक निर्णय आहे. या निर्णयाची देशात सगळी कडे प्रशंसा सुरु आहे. हा एक महत्वाचा निर्णय आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये या विषयवार चित्रपट बनवण्यासाठी लगबग सुरु झालेली दिसत आहे.

सध्या बॉलीवूडमध्ये देशा संबंधित घडणाऱ्या खऱ्या घटनांवर चित्रपट बनवले जात आहेत. उरी द सर्जिकल स्ट्राईक, आर्टिकल 15, अशा चित्रपटांंना प्रेक्षकांची पसंदी मिळत आहे. त्यामुळे आर्टिकल 370 वर चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांंमध्ये चढाओढ लागली आहे. असे सूत्रांंकडून समजत आहे. चित्रपटाचे नाव रजिस्टर करण्यासाठी निर्मात्यांनी लाईन लावली आहे. आता पर्यत जवळ-जवळ ५० पेक्षा जास्त नावे रजिस्टर झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

विषय हा महत्वाचा व ताजा असल्यामुळे या विषयावर चित्रपट बनवण्यासाठी सर्व निर्माते उत्साही दिसत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर नाव रजिस्टर करून कथा तयार करण्याकडे सगळ्यांची ओढ दिसत आहे. आता चित्रपट कधी आणि कशा पद्धतीने येणार आहे हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.