फेसबुक डेटा चोरी प्रकरण:केंब्रिज अॅनालिटिका आणि कॉंग्रेस-भाजपा

जगभरात रोजचे वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्यांवर केंब्रिज अॅनालिटिका , अमेरिकन निवडणुका , डोनाल्ड ट्रंप व फेसबुक यांच्यावर सारख्या बातम्या दाखविल्या जात आहे.डोनाल्ड ट्रंप यांनी केंब्रिज अॅनालिटिका च्या मदतीने व केंब्रिज अॅनालिटिका ने फेसबुक द्वारे कसे प्रभाव पाडून निवडणूक जिंकली याची चर्चा चालू आहे. भारतातील राजकारणही यामूळे चांगलेच तापले आहे.सत्ताधरी व विरोधक हे दोन्ही कसे या प्रकरणात एकमेकांचे कपडे फाडत आहे.हे आपण पाहत आहोत.या प्रकरणात तमाम आरोप प्रात्यारोप पाहता दोन्ही पक्ष चांगलेच गुंतलेले आहेत पण मान्य करत नाहीत असे दिसु येत आहे.तसेच आपला रोजचा दिवस ज्याने सुरु होता तो फेसबुक ही या वादात अडकला आहे.सध्या जगभरात #Deletfacebook खुप ट्रेंड होत आहे.याचा फटका बसत फेसबुक ला करोडो डॉलर्सचे नुकसान सासावे लागत आहे.या प्रकरणी मार्क झुकरबर्ग यांनी एक पोस्ट टाकत स्पष्टीकरण दिले आहे.

नेमके हे प्रकरण आहे काय हे समजून घ्यायचे असेल तर प्रथम आपणास केंब्रिज अॅनालिटिकाची पार्श्वभूमी माहित हवी.

Strategic Communication Laboratory (SCL) ही लंडनस्थित कंपनी आहे. SCL हि कंपनी ब्रिटिश बेहेविराल रिसर्च – स्ट्रेटेचिक कम्युनिकेशन वर काम करते. पब्लिकली हि कंपनी निवडणूक व्यवस्थापन करण्याचे काम करते असे सांगितले जाते.आतापर्यंत जगाभरातील २००निवडणुकाचा अनूभव असल्याचे सांगितले जाते. अर्जेटिना ,चेक रिपब्लिक,भारत केनिया अमेरिका, इंग्लंड या देशात कंपनीचे काम चालते. २०१२ पासुन कंपनी अमेरिकेत केंब्रिज अॅनालिटिका (CA) हि ब्रिटिश पोलिटिकल कंसल्टिंग फर्म सोबत काम करते.हि कंपनी डेटा मायनिंग ,डेटा ब्रोकरेज व डेटा अॕनालिसिस चे काम करते. केंब्रिज अॅनालिटिका मध्ये जे अमेरिकेचे प्रमुख गुंतवणुकदार ते टेड क्रुझ जे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्षिय उमेदवार होते,रोबर्ट मर्सर जे संशोधक ,उद्योगपती आहे. सुरवातीला क्रत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence ) यांनी विकसित केला होता , स्टेव वेबोन हे मिडिया एक्झेयुटिव जे ट्रंप यांच्या सुरवातीस सात महिने व्हाईट हाऊसचे चिफ स्ट्रेटेजीक होते व विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे होत.SCL सुरवातीस टेड क्रूझ यांचा प्रचार ही करत होती. ही कंपनी लाच देणे,सेक्स वर्कर द्वारे हनी ट्रेपमध्ये अडकवून काम आपले काम फत्ते करत असते असे ऐकण्यात आहे.

या प्रकरणाचा भांडाफोड १७ मार्च २०१८ च्या न्युयार्क टाईम्स व ऑब्झरवर या वर्तमानपत्रांनी फेसबुक चा वापर करुन खाजगी माहीती गोळा करत निवडणुकावर प्रभाव टाकल्याचा आरोप केला आहे. अमेरिकन नागरिक ख्रिस्तोफर वायली हे प्रकरणी व्हिसल ब्लोअर मानला जात आहे.वायली हे केंब्रिज अॅनालिटिका मध्ये काम करत होते. ५ करोड नागरिकांचा डेटा वापरत ट्रंप यांच्या प्रचाराचे डिझाइन केले गेले.निवडणुका २०१६ मध्ये होत्या पण तयारी २०१४ पासुन चालू होती असे त्यांनी सांगितले.
तसेच ब्रेक्झिट दरम्यान जनमत संग्रह ही प्रभावित केला गेल्याचा आरोप आहे.या प्रकरणी एक वर्षापासून ब्रिटेन तपास यंत्रणा या प्रकरणी तपास करत आहे.

आता फेसबुक कडे वळूयात.रोजच्या जिवनात आपण फेसबुकला कमी अधिक प्रमाणात का असेना महत्व देतो.आपली आवड-नावड ,स्टेटस,एखाद्या घटनेबाबत मत, आपल्या भावना समोरासमोर व्यक्त होण्यापेक्षा जे उत्तर देणार नाही वा प्रतिक्रिया देणार नाही त्या फेसबुक वर सरार्स टाकतो.नेमके कंपनी याच बाबींचा अभ्यास करणार.यासाठी केंब्रिज अॅनालिटिका ने केंब्रिज विद्यापिठातील मनोवैज्ञानिक अलेक्झांडर कोगेन यांची मदत घेतली.बदल्यात त्यांना लाखो डॉलर दिले गेले.या बदल्यात कोगन यांनी This is my life हे ऐप बनविले ज्याद्वारे फेसबुक वापरकर्र्त्याचा डेटा ट्रेप केला जाऊ शकतो.हे ऐप २.७०लाख लोकांनी डाऊनलोड केले ऐपच्या माध्यमातून एक क्विझ घेतली गेली.मोबदला म्हणुन पैसे देण्याचेही सांगितले गेले.या द्वारे डाऊनलोड करणारेच नाही तर त्यांचे मित्र ,कुटूंबातील व्यक्ती यांचाही डेटा चोरीला गेला.

अमेरिकेत फेसबुक युसर आपल्या पेक्षा कमीच आहे.तसेच फेसबुक हे ऐप मोबाईल मध्ये जास्त प्रमाणात वापरतो.त्यामध्ये आपले वेगवेगवेळे अकाउंटस ,संपर्क क्रमांक हे कंपनी हॅक करते. पण या लोकांचा रोजच्या जीवनात डोकावून आपला फायदा होऊ शकतो का याचा विचार करत बहुधा या कंपनी व राजकिय पक्षांनी ठरविले असावे,रोजच्या घडणाऱ्या घटना यांचा काय प्रभाव पडतो तसेच त्या विषयी त्यांचे काय प्रतिक्रिया व्यक्त करतात, लोक सध्या कोणत्या विचाराने प्रभावित आहे,कोणत्या पोस्ट जास्त शेअर होत आहे,फेसबुक वर सर्वांत चर्चेचा विषय कोणता , वैयक्तिक तुमचे विचार काय? तुम्ही कोणाला फोलो करतात ई.बाबींचा अभ्यास करुन Brain Mapping केली गेली व फेसबुक वापरकर्र्त्याच्या विचाराद्वारे त्यांची मनोवैज्ञानिक प्रोफाईल बनविल्या गेली.मग याचा वापर करत ५ करोड फेसबुक वापरकर्र्त्याना डोनाल्ड ट्रंप यांच्या समर्थन असणाऱ्या पोस्ट शेअर केल्या व जाहिराती दाखविल्या गेल्या.तसेच लोकेशन शेअर केल्याने कोणत्या ठिकाणी कोणता मुद्दा महत्वाचा आहे हे तपासले गेले व त्या ठिकाणी प्रचारात त्याच मुद्द्यावर जोर दिला गेला.सभेतही या मुद्द्यावर चर्चा केली गेली.त्याच स्वरुपाच्या जाहिराती बनविल्या गेल्या वसोशल मिडिया द्वारे त्या टर्गेटेड वोटर्स ना पाठविले गेले.टार्गेटेड वोटर्स हे एकच पसंती असलेला वर्ग आहे आहे.यांच्या विचारांना अनुकुल अशा जाहिरात मुळे तो मतदार वैयक्तिकरित्या प्रभावित होईल .
टेलिव्हिजन,रेडिओ वृत्तपत्र या द्वारे राजकिय जाहिराती करत मतदाता प्रभावित होईल असे नाही. पण फेसबुक हे वैयक्तिक बाब आहे.येथे तुम्ही वैयक्तिक रित्या कनेक्टेड असतात. आणि आपण सार्वजनिक पेक्षा वैयक्तिक असलेल्या दाव्याला महत्व देतो.

उदाहरणार्थ माझ्या फेसबुक वर मी नोकरी व बेरोजगारी या विषयी सतत पोस्ट टाकली व त्या संदर्भात असलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली याचा अभ्यास करुन त्यांनी मला लाईक केलेल्या कारणाने फिडमध्ये बेरोजगारी कशी दूर होईल ही जाहिराती टाकली.माझ्या संवेदनशील मनाला या द्वारे प्रभावित केले गेले.पर्यायाने मला वैयक्तिक वाटले कि हाच पक्ष माझ्या अडचणी समजू शकतो नि मी मतदान याच पक्षाला करणार.

फेसबुक वर आरोप झाले कि वैयक्तिक डेटा एक्सेस करायला कंपनीला अधिक सुट दिली गेली.फेसबुकने या प्रकरणी पहिले अंग झटकायचे काम केले .फेसबुकने सांगितले कि आम्ही नाव व फोटोच सार्वजनिक करतो.पण युजर या ऐपच्या जाळ्यात अडकल्यास तो ई मेल,जन्म तारिख ,नंबर ,ठिकाण स्वतः एक्सेस करायला देतो..पण जेव्हा deletfacebook ट्रेंड झाला तसेच लाखो अकाउंटस डिलीट झाल्यावर हजार करोडो डॉलर्सचा फटका बसल्यावर संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी पोस्ट द्वारे स्पष्टीकरण दिले.त्यांनी सांगितले कि ‘डेटा सुरक्षित ठेवणे आमची जबाबदारी आहे.जर आम्ही ते ठेऊ शकत नाही तर आम्ही अजून काय करु शकतो ते तपासुन पाहु.केंब्रिजअॅनालिटिका व कोगन यांनी धोका दिला आहे.मी फेसबुक चालू केल्यामूळे मी या घटनेस जबाबदार आहे.’

आता या गोष्टींचा भारताचा काही संबंध नसणार हे आपणास वाटत असेल पण राजकारण तर तापले आहे .आपले तर अमेरिकेच्या ही पुढे आहे.कॉंग्रेसने भाजपवर २०१०साली बिहार विधानसभा निवडणुकात केंब्रिज अॅनालिटिका ने मदत केल्याचा आरोप केला आहे.तसेच भाजपचे रविशंकर प्रसाद यांनी राहूल गांधी गुजरात विधानसभा निवडणुकात केंब्रिज अॅनालिटिकाची मदत घेतल्याचे सांगत आहे.तसेच २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकातही केंब्रिज अॅनालिटिका कॉंग्रेस बरोबर  करार झाल्याचे सांगितले आहे.शहजाद पुनावाला या पूर्व कोन्ग्रेसी  नेत्याने एक मेल दाखवत सांगितले कि जनता दल (सं) चे नेते के.सी त्यागी यांचे पुत्र अमरिश त्यागी यांची Ovleno Business Intelligence व केंब्रिज अॅनालिटिका चे CEO निक्स यांची सप्टेंबर २०१६ ला भेट झाली होती.तसेच अमरिश ने मला बॉस( राहुल गांधी) यांना प्रेझेंटेशन दाखविण्यासाठी बोलायला सांगितले होते.पण पुनावाला यांनी काही प्रत्युत्तर दिले नाही.कालांतराने अमरिश चा मेल आला कि बॉस शी चर्चा झाली आहे.यावरुन लक्षात येते कि आपलेही धूतलेले नाही . विरोधक व सत्ताधरी दोन्ही अडकलेले आहे.

आता विषय येतो आपला….
सोशल मिडियाचा वापर दिवसेंदिवस भारतात मोठ्या प्रमाणात होत आहे.ट्विटर,फेसबुक,इंस्टाग्राम,व्हाटस अप हे मोठ्या प्रमाणात वापर करता डाऊनलोड केल्या जात आहे .भारत ही विदेशी कंपन्यासाठी मोठी बाजारपेठ आहे.फेसबुक वर आपण रोज काही ना काही पाहतो,शेअर करतो , आवड-नावड दर्शवितो. आपला राजकीय पक्ष कोणता शोभतो,आपणात कोणता हिरो दडलाय,तुम्हाला या चित्रपटत कोणता रोल आहे,तुम्ही राजकारणात कोणत्या पदावर जाणार , मंत्रिमंडळात कोणते खाते मिळणार.तुमचे प्रेम कोणत्या शहरात आहे.तसेच आपण तर आपले मरण कसे नि कधी होणार हे सुद्धा बघितले दाखविले आहे,
या अशा ऐपच्या द्वारे आपण आपली खाजगी माहिती संबंधित कंपनीला विनासायास देवून या स्वतः ला त्यांच्या विचारांनी बंदिस्त करत आहोत.एखादा ऐप वा क्विझ वापरा दरम्यान पॉपअप्स येत असतात.ते तुमचा नाव,कुटुंब ,ई मेल,जन्म तारिख ॲक्सेस करावयाची परवानगी मागतात.आपण त्या ॲप वा क्विझ च्या नादात ओके करुन परवानगी देवून टाकतो. नेमके ईथेच सर्व घोळ होतो.हा डेटा हेकर्स कोणालाही सहज विकतात.मग ते राजकिय पक्ष असो वा उत्पादक कंपनी.ते त्यांच्या स्वार्था साठी वाट्टेल त्या किमतीत घेतात.कधी विचार केला का तुम्ही तुमची ऐपत नसताना तुम्हाला क्रेडित कार्ड साठी फोन येतो, आमची अमुक स्किम आहे नि तुम्ही लकी ग्राहक आहे, तुम्ही २००० ची खरेदी केल्यावार ५००रुपये कॅशबॅॅक  म्हणजे जेथे तुम्ही शुन्य खर्च करणार होता तिथे १५०० खर्च करतात.म्हणजे तुमचा राजकीय तसेच व्यवसायिक वापर होत आहे.हे आपल्या लक्षात येत नाही.जर एखादा ॲप डाऊनलोड केल्यावर त्यांना आपला मेल,नंबर,संपर्क क्रमांक,लोकेशन का लागतात याचा विचार डोक्यावर का येत नाही.? या साठी आपल्याला सजग राहण्याची गरज आहे.संविधानाने आपणास खाजगी जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे.तो आपणच भंग करत आहोत.केंद्र सरकारने पोर्न साईटस वर बंदी , गो मांस विक्री वर बंदी आणली तेव्हा खाजगी जिवनात सरकार हस्तक्षेप करते असे आपण म्हणतो.पण येथे आपली खाजगी माहिती चोरली जात आहे याचे भानच नाही. २०१९ निवडणुकात सर्व राजकीय पक्ष समाज माध्यमांचा पुरेपुर वापर करणार यात शंका नाही.आपण फक्त त्यांच्या जाळ्यात अडकू नये म्हणजे झाले.

– डॉ.सुनिलसिंग राजपूत

You might also like
Comments
Loading...