उर्मटपणाची भाषा, उद्धटपणा हे सहन केलं जाणार नाही

ajit pawar

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, हि धोक्याची घंटा आहे. त्यामुळे अजूनही लोकांनी गर्दी करणे टाळले नाही, बेजबाबदारपणे वागणं सोडलं नाही तर लॉकडाउन वाढूही शकतो. असा संकेतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. त्यामुळे सर्वांनी लॉकडाउनचे, संचारबंदीचे नियम काटेकोरपणे पाळावेत असं आवाहन अजित पवार यांनी पुन्हा एकदा केलं आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखत दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले,’ जीवनावश्यक वस्तू घेताना, मेडीकलमध्येही नागरिकांनी गर्दी करु नका. NGO, देवस्थानं, कंपन्या यांच्याकडून सरकारला चांगली मदत मिळत आहे. मात्र, जो कोणी कायदा हातात घेत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. त्यामुळे सरकारी यंत्रणांना कुणीही त्रास देण्याचा प्रयत्न करु नये, उर्मटपणाची भाषा, उद्धटपणा हे सहन केलं जाणार नाही. असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच सुरक्षित बसा आणि घरात थांबा असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार पुढे म्हणाले,’ देशावर आणि महाराष्ट्रावर सध्या जे संकट आलं आहे त्या संकटात सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. कुणीही कसलंही राजकारण करु नका. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याशीही भेट झाली होती. जगावरच्या संकटातून आपली सुटका होण्यासाठी आपण सोशल डिस्टन्सिंग पाळायचं,असं शरद पवारांनी सांगितल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.