बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानी पारंपारिक पद्धतीने बाप्पाचं आगमन

बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानी पारंपारिक पद्धतीने बाप्पाचं आगमन

मुंबई : महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजेच गणेशोत्सवाला आजपासून झाली आहे. पुढील दहा दिवस महाराष्ट्राच्या सर्वोच्च संस्कृती आणि परंपरेचं दर्शन अवघ्या जगाला होणार आहे. गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी कोविड 19 संसर्गाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. त्यातच आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी गणेशोत्सवात निर्बंध घालत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात.

आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते. दरवर्षी कलाकारांच्या घरी आगमन होणाऱ्या गणपतीची देखील विशेष चर्चा असते. त्याचप्रमाणे नेत्यांच्या घरी विराजमान होणाऱ्या गणपतीची देखील तितकीच चर्चा असते. आज दुपारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या संगमनेर निवासस्थानी सपत्नीक बाप्पांची प्रतिष्ठापना केली.

बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत गणपतीची आरती करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये लिहिले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही संगमनेर येथील सुदर्शन निवासस्थानी पारंपारिक पद्धतीने, मंगलमय वातावरणात, श्री गणरायाची प्रतिष्ठापना केली. कोरोना महामारी आणि राज्यावरील अतिवृष्टी व पूराचे संकट दूर करून सर्वांना नवी उभारी घेण्यासाठी बळ देण्याची प्रार्थना बाप्पाकडे केली’, असे म्हणत त्यांनी राज्यावरील संकट दूर व्हवं ही प्राथना बाप्पा चरणी केली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या घरी दरवर्षी बाप्पांची प्रतिष्ठापना होत असते. मात्र कोरोनाचे संकट पाहता या वर्षी थोरात यांनी अगदी साधेपणाने श्रींची प्रतिष्ठापना केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या