रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना परभणीतून अटक, गुन्हा दाखल

परभणी : कोरोनाच्या संसर्ग काळात महत्त्वपूर्ण असणाऱ्या रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा काळाबाजार करणार्या दोघांना नवा मोंढा पोलिसांच्या पथकाने गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. विजय हाके तसेच रवी आधारे असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
परभणीतील बसस्थानक परिसरातील हाके मेडीकलविरुद्ध बुधवारी  रात्री दहा वाजेच्या सुमारास महसूल विभाग तसेच आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या पथकाने रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा काळाबाजार करणार्यावर ही कारवाई केली. तसेच दोघांवर नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन हाके मेडीकलला सील करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने निरीक्षक बळीराम मरेवार यांच्या तक्रारीवरून नवामोंढा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
विजय हाके तसेच रवी आधारे हे दोघे जण संगणमत करून रेमडेसिव्हीर हे इंजेक्शन जीवनावश्यक वस्तू आहे, हे माहीत असतानाही त्यावरील छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करताना या पथकाला आढळून आले. सरकारने घालून दिलेल्या औषधांच्या किंमत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केले आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
मेडीकल चालक विजय हाके आणि रवि आधारे या दोघांना अटक केल्याची असल्याची माहिती नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी दिली आहे. रेमडेसिव्हीर तुटवडा होता. मात्र, प्रत्यक्षात अनेक मेडिकल दुकानदारांनी हे इंजेक्शन दाबून ठेवले असून, ओळखीच्या ग्राहकांना तसेच ज्यादा दर देणार्या ग्राहकांनाच हे इन्जेंशन विक्री करत असल्याने अनेक गरीब रुग्ण या इंजेक्शनपासून वंचित राहत होते.
महसूल  तसेच अन्न व औषध प्रशासनाने केली ही कारवाई 
 बसस्थानकाजवळील मेडिकल लाईनमध्ये असलेल्या काही मेडिकलमध्ये कोरोना रुग्णांसाठी उपचारासाठी लागणार्या रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा काळाबाजार सुरु असल्याची माहिती महसूल प्रशासनाला सुत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर यांनी सायंकाळी 7. 30 वाजल्यापासून मिळालेल्या माहितीच्या आधारे मेडीकलवर तेथील ग्राहकांवर पाळत ठेवली होती. त्या मेडीकलवर रेमडेसिव्हीर इंजेक्शनची विक्री होते. का? त्याचा भाव  किती?  किती रुपयांना हे विक्री केल्या जात आहे. याची खातरजमा करुन घेतली. त्यानंतर हाके मेडिकलचा चालक हा ४ हजार 200 रुपयांचे इंजेक्शन हे ६ हजार रुपयांना विक्री करत असल्याचे आढळले होते.

महत्त्वाच्या बातम्या :