अंजली दमानिया यांच्या अडचणीत वाढ, अटक वॉरंट जारी

anjali damaniya and eknath khadse

टीम महाराष्ट्र देशा- आम आदमी पार्टीच्या अंजली दमानिया यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचं चित्र आहे.  एकनाथ खडसे यांच्यासह भाजप पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी दाखल खटल्यात वारंवार गैरहजर राहत असलेल्या दमानिया यांच्याविरुद्ध अखेर रावेर न्यायालयाने शुक्रवारी अटक वॉरंट जारी केलंय.

खडसे यांच्या बदनामी प्रकरणी तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी दमानियांविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला आहे. यापूर्वीदेखील दमानियांविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आले होते मात्र दमानिया यांच्या प्रकृती अस्वास्थासह त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्या न्यायालयात उपस्थित राहू शकत नसल्याची बाजू मांडल्यानंतर हे अटक वॉरंट मागे घेण्यात आले होते.

दरम्यान, नुकतीच मुंबई मध्ये पत्रकार परिषद घेऊन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सहकारी कल्पना इनामदार यांनी देखीलदमानिया यांच्या गंभीर आरोप केले होते. एकनाथ खडसे यांना अडकवण्यासाठी खडसेंच्या टेबलवर नोटा ठेवण्याबाबत अंजली दमानिया यांनी मला सांगितलं होतं असा गौप्यस्फोट इनामदार यांनी केला होता .