टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. मराठा क्रांती मोर्चा कडून उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट आदेश देण्याची मागणी न्यायालयात केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून या मोर्चांचा उल्लेख ‘मराठा क्रांती मुका मोर्चा’ असा करण्यात आला होता. या प्रकरणी दत्ता सूर्यवंशी नावाच्या व्यक्तीने उद्धव ठाकरे यांची न्यायालयात याबाबत तक्रार दाखल केली होती. मात्र उद्धव ठाकरे हे एकदा देखील न्यायालयात हजर राहिले नसल्याने फिर्यादीच्या वकिलाकडून न्यायालयात अटक वॉरंटची मागणी होत आहे.
तक्रार दाखल केलेल्या फिर्यादीच्या वकिलांनी म्हटले आहे की, आरोपीविरूद्ध समन्सची बजावणी होऊनही आरोपी मागील तारखेपासून न्यायालयात तारखेला हजर राहत नाही. आरोपी हे प्रकरण लांबविण्याच्या उद्धेशानेच न्यायालयात हजर राहत नसल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे तरी, आरोपीविरूद्ध अटक वॉरंट जारी करण्यात यावे अशी मागणी फिर्यादीने केली आहे.