क्रिकेटपटू मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट जारी

mohmmad shami

टीम महाराष्ट्र देशा- भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पत्नी हसीन जहाँ हिने शमीवर घरघुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. यानंतर शमी आणि भाऊ हसीद अहमद यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. सरेंडरसाठी त्याला कोर्टाने १५ दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत शमी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करु शकतो असेही कोर्टाने म्हटले आहे. मात्र शमीविरोधात आणि त्याच्या भावाविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याने त्याच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

२०१८ मध्ये मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहांने मारहाणी, बलात्कार आणि हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप केले होते. या सगळ्या प्रकरणी हसीन जहाँनं शमी विरोधात गुन्हा दाखल केला होता. याविरोधात सुनावणी दरम्यान न्यायालयाने दोघांविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.त्यामुळे शमीचे क्रिकेटमधील करिअर पणाला लागले होते. सध्या शमी वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळत आहे. त्यामुळं त्याला तातडीनं भारतात येण्याची विनंती करण्यात आली आहे.