अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट

टीम महाराष्ट्र देशा – रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्याविरोधात बिहारच्या मधेपुरा सिव्हिल कोर्टाने अटक वॉरंट काढलं आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने एका व्यक्तीच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोबदला न दिल्याने हे अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
रिलायन्स जनरल इन्सुरन्स कंपनीने मधेपुरातील सैनी साह यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोबदला दिला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. मृत सैनी साह बैहरी गावाचे रहिवासी होते. १३ जुलै २०११ ला आसामच्या तिलोई गावात ट्रक अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी रिलायन्स जनरल इन्सुरन्स कंपनीकडून विमा काढला होता.

१६ ऑगस्ट २०११ रोजी सैनी यांची आई कौशल्या देवी यांनी मोबदल्यासाठी विमा कंपनीवर दावा दाखल केला होता. त्यावर कोर्टाने सैनी यांच्या कुटुंबियांस २८ फेब्रुवारी २०१७ रोजी १८ लाख ८३ हजार रुपये आणि त्यावर ९% टक्के वार्षिक व्याज देण्यास सांगितलं. पण तरीही मोबदला न मिळाल्याने कौशल्या देवी यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने यासंदर्भात कंपनीला दोनवेळेस नोटीस पाठवली पण कोणतंही उत्तर आलं नाही.

त्यानंतर कंपनीचे चेअरमन अनिल अंबानी यांना अटक करण्याचा अर्ज कोर्टात दाखल करण्यात आला, तसंच न्यायालयाकडे महाराष्ट्राच्या डीजीपी यांच्या माध्यमातून अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्याची विनंती करण्यात आली. अखेर न्यायालयाने ही विनंती स्वीकारत अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले.

bagdure

डॉ. स्वाती पाटील आत्महत्या प्रकरणातील जामीन अर्ज फेटाळला

डॉ. स्वाती पाटील आत्महत्या प्रकरणातील जामीन अर्ज फेटाळला

You might also like
Comments
Loading...