आमदार विजय भांबळेंना अटक करा : संभाजी सेनेची मागणी

टीम महाराष्ट्र देशा : जिंतूर राष्ट्रवादीचे आमदार बिजय भांबळे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी परभणी संभाजी सेनेने केली आहे. जिंतूर नगर परिषदेचे कर्मचारी दत्ताराव तळेकर यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ ही मागणी करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी जिंतूर नगर परिषदेचे कर्मचारी दत्तराव तळेकर यांना आमदार विजय भांबळे समर्थकांकडून मारहाण करण्यात आली. दरम्यान तळेकर यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ परभणी संभाजी सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

संभाजी सेनेने दिलेल्या त्या निवेदनात आमदार विजय भांबळे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. आमदार भांबळे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, परभणी संभाजी सनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, सुधाकर सोळंखे, संभाजी सेना शहर प्रमुख अरुण पवार, राजेश बालटकर, आदी संभाजी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.