संभाजी भिडेंना अटक करा ; रामदास आठवले काढणार मोर्चा

टीम महाराष्ट्र देशा : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी घेऊन सत्तेत सहभागी असणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आता मोर्चा काढणार आहेत.

संभाजी भिडेंना अटक आणि अॅट्रॉसिटी काद्याच्या संरक्षणासाठी आरपीआय आठवले गट 2 मे रोजी मोर्चा काढणार आहे. म्हाडा कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व रामदास आठवले करणार असल्याची माहिती आरपीआयचे नेते अविनाश म्हातेकर यांनी दिली.

१ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव इथं दोन गटामध्ये हिंसाचाराचा भडका उडाला होता. या प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली होती. त्यांची सध्या जामिनावर सुटका झालीये. मात्र, अद्यापही संभाजी भिडे यांना अटक करण्यात आली नाही.

You might also like
Comments
Loading...