गृहमंत्र्यांच्या विरोधात बदनामीकारक पोस्ट करणाऱ्यांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी

anil deshmukh

राळेगाव : राज्याचे गृहमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्याबद्दल फेसबूकवर बदनामीकारक पोस्ट करणाऱ्याला राळेगाव पोलिसांनी अटक करण्याचे मागणी राळेगाव येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षांनी केली आहे.

अक्षय पिपलवार याने फेसबूक युजरने अनिल देशमुख यांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर पोस्ट केला होता. त्यानंतर राळेगाव येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब शहराध्यक्ष प्रकाश खुडसंगे यांच्या ध्यानात आणून दिली. त्यांनी तत्काळ उपविभागीय अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देऊन अक्षय पिपलवार यास अटक करण्याची विनंती केली.

अक्षय यांनी समाजमाध्यमातून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून, या प्रकारामुळे अशांतता निर्माण होऊ शकते, सदर व्यक्तीवर तत्काळ गुन्हे दाखल करावे व त्याला अटक करावी अशा आशयाचे निवेदन खुडसंगे यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

एकनाथ खडसेंनी राज्य सरकारवर केली टीका; म्हणाले, “मी कृषिमंत्री असताना…”

नाराजीचे कारण ठरलेल्या ‘महाजॉब्स’च्या जाहिरातीत काँग्रेसला मिळाले स्थान; या नेत्याचे झळकले फोटो

‘दुधाचे भाव कमी झाल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली’

राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी घोषणा केलेल्या १ कोटी मधला एकही रुपया अजून आला नाही!

पुणे : २९ दिवसांत तब्बल २२,१७२ जण रूग्ण ठणठणीत झाले बरे