fbpx

२६ मार्चपर्यंत संभाजी भिडेंना अटक करा अन्यथा… ; प्रकाश आंबेडकरांचा निर्वाणीचा इशारा

प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा : २६ मार्चपर्यंत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनाही अटक करा, नाहीतर मुंबईत मोर्चा काढू, असा निर्वाणीचा इशारा भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिला आहे.

कोरेगाव-भीमा हिंसाचार भडकावण्याच्या कटात मिलिंद एकबोटे यांच्यासह संभाजी भिडे यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे मिलिंद एकबोटेंना अटक केल्यानंतर आता संभाजी भिडेंनाही २६ तारखेपर्यंत अटक करा, अन्यथा कोरेगाव-भीमा शौर्य दिन प्रेरणा अभियान आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे मुंबईत मोर्चा काढू, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.