भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना अटक; डॉ चंदनवालेंना काळंं फासण्याचा दिला होता इशारा

पुणे : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी अटक केली आहे, देसाई यांनी ससूनचे अधिष्ठाता डॉ अजय चंदनवालेंना काळ फासण्याचा इशारा दिला होता, त्यामुळेच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत देसाई यांनी, डॉ अजय चंदनवाले यांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र देत ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता म्हणून नेमणूक करून घेतल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच मुख्यमंत्र्यानी त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. दरम्यान, त्यांच्यावर कारवाई न झाल्यास हॉस्पिटलमध्ये जाऊन काळ फासण्याचा इशारा दिला होता.

काळ फसण्याची धमकी दिल्याने आज सकाळी बंड गार्डन पोलिसांनी त्यांना कात्रज येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. डॉ. चंदनवाले कोठेही अपंग असल्याचे दिसत नाहीत, आपल्या पदाचा गैरवापर करत त्यांनी खोटे प्रमाणपत्र बनवून घेतले आणि ससूनच्या अधिष्ठातापदी नेमणूक करून घेतली. तसेच कोणत्याही पदावर 3 वर्षाच्यावर राहत येत नाही मात्र मागील 7 वर्षांपासून ते एकाच पदावर काम करत असल्याचा आरोप देसाई यांनी डॉ. चंदनवाले यांच्यावर केला होता.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

ऑनलाईन गेममधून तरुणीचे अश्लील छायाचित्र व्हायरल करणाऱ्या तरुणाला अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा रचला होता कट; एकाला अटक

Shivjal