२० कोटींचा बनावट चेक वठवून बँकेची फसवणूक करणा-या ७ जणांना अटक

टीम महाराष्ट्र देशा :  २० कोटी रूपयांचा बनावट चेक वठवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या २ कर्मचा-यांसह ७ जणांना उस्मानाबाद पोलिसांनी अटक केली. उस्मानाबाद शहरातील आयसीआयसीआय बँकेमधून बनावट चेकचा वापर करून हर्बल लाईफ इंडिया या बंगळुरु येथील कंपनीच्या खात्यातून २० कोटी रक्कम हडप करण्याचा हेराफेरीचा प्रकार उस्मानाबाद पोलिसांनी उघड केला आहे.

आयसीआयआय बँकेचे कर्मचारी सय्यद फरहान, नरेश राठोड, चालक सुंदरआबा पोफळे तसेच धिरज कोळी, वैभव कोटेचा, फुलाई मल्टी स्टेटचे अध्यक्ष मारुती खामकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप खामकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

You might also like
Comments
Loading...