fbpx

चेहऱ्यावरील पिंपल्सने त्रस्त आहात ?- ‘हे’ करा घरगुती उपचार

टीम महाराष्ट्र देशा : पिंपल्स कुठल्याही वयात येऊ शकतात पण विशेष करून वयात येणाऱ्या मुलांमध्ये प्रमाण जास्त असते. विशेष करून गालांवर, कपाळावर, हनवटीवर पिंपल्स येतात. तसेच पिंपल्स छातीवर येऊ शकतात.

पिंपल्स येण्याची अनेक करणे असू शकतात. हार्मोन्सचं असंतुलन, बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या अयोग्य वेळा, धूळ, प्रदूषण, ऊन यामुळे मुरुमं येतात. मलावरोध हे देखील मुरुमं येण्याचं कारण आहे.

पिंपल्सवर लसून अगदी परिनामकारक ठरत. लसनेची पाकळी कुस्करून मुरुमावर लावल्याने मुरुमं निघून जातो. लसनेची पाकळी कुस्करून मुरुमावर दिवसातून बऱ्याच वेळा लावले पाहिजेल यामुळे लवकर पिंपल्स पासून सुटका होईल.

तसेच आपण दिवसातून ३ वेळा लसून चावून-चावून खाल्ले पाहिजे. यामुळे डाग, व्रण नाहीसे होतात. याचप्रमाणे अनेक त्वचा विकारांवर देखील लसून खूप परिणामकारक ठरते. पचन शक्तीच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे पिंपल्स येण्याची शक्यता असते. यासाठी दही, डोसा, इडली या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

महत्वाच्या बातम्या