अर्णब गोस्वामींच्या अडचणी वाढल्या ; टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांनी केले आरोपी घोषित

arnab goswami

मुंबई : बहुचर्चित टिआरपी घोटाळा प्रकरणी अखेर रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आरोपी घोषित करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आपलं पुरवणी आरोपपत्र मंगळवारी कोर्टापुढे सादर केलं. या आरोपपत्रात अर्णब गोस्वामींसह सात नव्या आरोपींचा समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता 22 वर पोहचली आहे. एकूण 1912 पानांचं हे आरोपपत्र असून अर्णब गोस्वामींसह प्रिया मुखर्जी, शिवा सुब्रमण्यम, अमित दवे, संजय वर्मा, शिवेंद्र मुलधेरकर, रणजित वॉल्टर यांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता अर्णब गोस्वामी यांच्या आडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नऊ महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघडकीस आणला. यामध्ये रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीची कंपनी एआरजी आऊटलियर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि या वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचं नाव आलं होतं. या प्रकरणी आज मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात १८०० पानांची पुरवणी आरोपपत्र दाखल केलं. अर्णब गोस्वामी यांचा पहिल्यांदाच आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यासह सात जणांचा आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या २२ झाली आहे.

या सर्वांवर आयपीसी कलम 406 (गुन्हेगारी कारवाई), 409 (व्यावसायिकाकडनं फसवणूक), 420 (आर्थिक फसवणूक), 465 (अफरातफर), 468(आर्थिक फसवणूकीच्या हेतूनं फेरफार), 120(बी) (कट रचणे), 201 (पुरावे नष्ठ करणे), 34 (संगनमतानं केलेला गुन्हा) या विविध कलमांखाली आरोप लावण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

IMP