सेनेच्या वाघाचे आता कासव झाले; अजित पवार

शिवसेना सत्तेसाठी लाचार

लोहा: राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा मराठवाड्यात सुरुच आहे. याच हल्लाबोल यात्रेदरम्यान अजित पवार आणि धनंजय मुंडे लोहा दौऱ्यावर होते त्याचवेळी अजित पवारांनी सरकारवर टीकेचे ताशेरे ओढले. आणि सेनेच्या वाघाचे आता कासव झाले असे म्हणत शिवसेनेवरही टीका केली.

शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे, अशी टीकाही पवारांनी केली. राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत धनंजय मुंडेही होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ते म्हणाले, ‘मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमावर १ लाख रुपये खर्च होतो आणि मुख्यमंत्र्यांच्या मेकअपवर आणि लाईटवर २६ लाख रुपये खर्च होतो.

bagdure

राष्ट्रवादीने १५ वर्षे काँग्रेससोबत सरकार चालवले. मात्र एका पक्षाचा आमदार दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी स्टेजवर गेला नव्हता. शिवसेनेचे नांदेडचे आमदार भाजपचा प्रचार करताना दिसले होते. सेनेच्या वाघाचे आता कासव झाले आहे अशीही टीका अजितदादांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही अजित पवार आक्रमक झाले. सरकार एकीकडे ग्रामीण भागात वीजेच्या जोडण्या तोडून टाकते आणि दुसरीकडे पाण्याचे दर वाढवते. बावचळलेल्या सरकारकडे कृषीविषयक धोरणच नाही. तीन वर्षात निकृष्ट दर्जाची बांधकामे झाली आहेत.

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला उस्मानाबादमधून सुरूवात झाली. या आंदोलनात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. तर समारोप औरंगाबादमध्ये होणार आहे. समारोपाच्या सभेला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तर २२ फेब्रुवारीपासून हल्लाबोल आंदोलनाचा तिसरा टप्पा उत्तर महाराष्ट्रातून सुरू होणार आहे.

You might also like
Comments
Loading...