बाळाला कवेत घेऊन महिला लष्कर अधिकारी पतीच्या अंत्यसंस्कारासाठी हजर

अंत्यसंस्कारासाठी पोहचलेल्या त्यांना पाहून उपस्थितांची छाती अभिमानाने फुलली

नवी दिल्ली: आसाममध्ये १५ फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हा अपघात मजुली आयर्लंडवर झाला होता. या अपघातात दोन पायलट्स शहीद झाले, त्यांच्यापैकी एक होते विंग कमांडर डी वत्स. आपल्या जवळील माणसाचं निधन झाल तर नक्कीच आपण कोसळून जातो. मात्र आपले जवान आणि त्यांचे कुटुंब या परिस्थितीचा कसा सामना करत असतील, हे विचार करूनच मन स्तब्ध होत.

shahid dushant vast

नुकतीच डोळ्यांबरोबर मनालाही रडवणारी घटना घडली. विंग कमांडर डी वत्स यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान त्यांची पत्नी आपल्या पाच दिवसांच्या नवजात बाळासोबत पोहोचली होती. बाळाला कवेत घेऊन अंत्यसंस्कारासाठी पोहचलेल्या महिला लष्कर अधिकाऱ्याला पाहून उपस्थितांची छाती अभिमानाने फुलली होती.

indian army man wife

एकीकडे मुलीच्या जन्माच सुख तर दुसरीकडे आयुष्याचा आधार गेल्यामुळे दु:ख. मात्र खचून न जाता त्यांनी आपल्या पाच दिवसाच्या बाळाला कवेत घेत लष्करी गणवेशात पतीच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली. डी वत्स यांची पत्नी मेजर कुमूद डोगरा स्वत: लष्करात अधिकारी आहेत. नुकतंच त्यांच्या घरी बाळाचं आगमन झालं असून ते फक्त पाच दिवसांचं आहे.

 

You might also like
Comments
Loading...