चेन्नई: तामिळनाडूमधील जंगलामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा धक्कादायक अपघात झाला आहे. जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या हेलिकॉप्टरमधील (Army Chopper Crash) 2 जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या वेलिंग्टन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे बडे अधिकारी होते. त्यांचा तपास सुरू आहे.
सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांच्यासह पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आयएएफ पायलट यांच्यासह अन्य लोक हेलिकॉप्टरमध्ये होते. सीडीएस बिपिन रावत हे गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावतही अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये होत्या. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबतची अधिकृत माहिती अद्यापतरी समोर आली नाही.
13 of the 14 personnel involved in the military chopper crash in Tamil Nadu have been confirmed dead. Identities of the bodies to be confirmed through DNA testing: Sources
— ANI (@ANI) December 8, 2021
हेलिकॉप्टर दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर राजभवनमधील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणारा दरबार हॉलचा कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. अशी माहिती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी दिली. या दुर्घटने संदर्भातली माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या संसदेत देण्याची शक्यता आहे. त्याआधी राजनाथ सिंह घटनास्थळी भेट देण्याचीही शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ प्रसिद्ध मोबाईल कंपनीच्या टॉवरचे साहित्य औरंगाबाद महापालिकेकडून जप्त
- आयसीसी क्रमवारीत भारतीय फलंदाजांची जबरदस्त झेप, अश्विनलाही झाला मोठा फायदा
- हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर नितीन गडकरींची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
- ‘रविचंद्रन अश्विन अशीच गोलंदाजी करत राहिल्यास कुंबळेलाही मागे टाकेल’
- मावशी पद्मीनी कोल्हापूरेंनी केलेल्या कमेंटमुळे श्रध्दा कपूरची पोस्ट आली चर्चेत