राजकीय भाष्य करणे हे लष्करप्रमुखाचे काम नाही- ओवेसी

owesi vs rawat

टीम महाराष्ट्र देशा- राजकीय पक्षांवर भाष्य करणे हे लष्कर प्रमुखांचे काम नाही, अशा शब्दात असदुद्दिन ओवेसी यांनी रावत यांच्यावर निशाणा साधला आहे. आसाममधील राजकीय पक्षाबाबत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केलेल्या विधानाचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत.

काय म्हणाले होते लष्करप्रमुख ?

सोमवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी आसाममधील बद्रुद्दीन अजमल यांच्या ऑल इंडिया डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ) पक्षाबाबत भाष्य केले होते. ‘बेकायदा मुस्लीम निर्वासितांमुळेच आसामसारख्या राज्यात एआययूडीएफसारख्या पक्षाची वाढ झाली. या पक्षाची वाढ भाजपा पेक्षाही जास्त वेगाने होत आहे’ मुस्लीम निर्वासितांच्या घुसखोरीमागे चीन व पाकिस्तान या देशांचा हात असून या क्षेत्रातही अशांतता निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

नाराज ओवेसींची आगपाखड

लष्करप्रमुखांनी राजकीय विधानं का करावे, लोकशाहीत राजकीय पक्षाची स्थापना करणे आणि तो वाढवण्याची मुभा आहे . लष्करप्रमुखांनी राजकीय विषयांमध्ये हस्तक्षेप करु नये. एखाद्या पक्षाच्या वाढीवर भाष्य करणे हे लष्करप्रमुखाचे काम नाही. लोकशाहीने व देशाच्या संविधानाने राजकीय पक्षांना स्वातंत्र्य दिले आहे. लष्कराने नेहमीच देशातील जनतेने निवडून आलेल्या नेतृत्वाखालीच काम केले पाहिजे.