fbpx

धक्कादायक : माझ्या आत्महत्येला भाजप-सेना सरकारच जबाबदार ; चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने जीवन संपवले

Farmer_suicides mp

टीम महाराष्ट्र देशा : राज्यावर दुष्काळाचे भीषण संकट असताना राज्यकर्ते मात्र प्रचार आणि निवडणुकीच्या चिखलफेकीत गुंग झाले आहेत. नेते एकीकडे आश्वासनाचा पाउस पाडत असताना शेतकऱ्याला मात्र सरकारच्या नाकर्त्या धोरणामुळे आपलं जीवन संपाव लागत आहेत. अशीच एक चीड आणणारी धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून यवतमाळमधील शेतकऱ्यानं आत्महत्या केली. शेतकऱ्यानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत भाजपा-शिवसेना सरकारचा उल्लेख आहे. शेतकऱ्यानं त्याच्या आत्महत्येसाठी राज्य सरकारला जबाबदार धरलं आहे. शेतकऱ्यानं लिहिलेली चिठ्ठी मृतदेहाशेजारी आढळून आली.

दरम्यान, यवतमाळच्या पांढरकवडामधील पहापळचे रहिवासी असलेल्या 52 वर्षीय धनराज बळीराम नव्हाते यांनी काल आत्महत्या केली. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मृतदेहाजवळ सापडली. यामध्ये त्यांनी त्यांच्या अवस्थेसाठी राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला जबाबदार धरलं आहे. नव्हाते यांची 4 एकर शेती असून त्यांच्यावर सावकाराचं 2 लाखांचं कर्ज होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बळीराम नव्हाते बुधवारी सकाळी त्यांच्या विवाहित मुलीला भेटण्यासाठी घराबाहेर पडले. त्यांची मुलगी वणीला वास्तव्यास आहे. मात्र ते दुसऱ्या दिवशी घरी परतले नाहीत. यानंतर कुटुंबानं त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी त्यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील खड्ड्यात सापडला. त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.