‘अरमान फक्त घटस्फोटीत म्हणाला नव्हता तर..’काम्याचं ट्वीट व्हायरल

‘अरमान फक्त घटस्फोटीत म्हणाला नव्हता तर..’काम्याचं ट्वीट व्हायरल

arman

मुंबई : स्पर्धकांमधील वाद, एकमेंकांवर केल्या जाणाऱ्या कमेंटस् यासह मनोरंजन करणारी मालिका म्हणजे ‘बिग बॉस १५’. ‘बिग बॉस १५’ सुरु झाल्यापासून हा शो चर्चेचा विषय ठरत आहे. नुकत्याच एका भागात प्रतीक सहजपाल आणि जय भानुशालीमधये वाद रंगलेला पाहिला मिळाला. यावेळी जयने प्रतिकला आईवरून शिवीगाळ केली होती.

या वागण्यावर अनेक प्रेक्षकांनी तसचं इतर कलाकारांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर माजी बिग बॉस स्पर्धक अभिनेत्री काम्या पंजाबीने मत व्यक्त केलंय. खरं तर काही दिवसांपूर्वी काम्या पंजाबीने क्रिकेटमध्ये झालेल्या शिवीगाळ प्रकरणावर एक ट्वीट केलं होतं. यावर एका युजरने काम्याला तिने देखील जुन्या पर्वात अमरमानने शिवीगाळ केल्याने ड्रामा केल्याची आठवण करुन दिली आहे.’क्रिकेटची तुलना बिग बॉससोबत करू नका’ असं हा युजर म्हणाला होता. यावर आता काम्या पंजाबीने उत्तर दिलंय.

तसंच बिग बॉसच्या घरात शिवीगाळ करण्यावर ती म्हणाली, ‘अरमान फक्त घटस्फोटीत म्हणाला नव्हता तर त्याने मला आई- बहिणीवरून शिवीगाळ देखील केली होती. मी त्याच्यासमोर हसत होते आणि एकटी असताना रडत होते. बिग बॉसची प्रॉपर्टी देखील तोडली नाही. नाही तर आम्हा दोघांमध्ये काय फरक राहिला असता. शिवी ही शिवीच असते मग ती क्रिकेटमध्ये दिलेली असो किंवा बिग बॉस’ असं काम्या या ट्वीटमध्ये म्हणालीय. सोशल मीडियावर काम्या पंजाबीचं हे ट्वीट चांगलच व्हायरल होतंय. या ट्वीटवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. काम्या पंजाबी कायम तिचं रोखठोक मत मांडत असते.

महत्त्वाच्या बातम्या