Abdul Sattar | मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी संपताना दिसत नाहीत. पक्षाचे नेते आणि विधानसभेतील उपनेते अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली होती. खोतकर आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते. या भेटीनंतर अर्जुन खोतकर लवकरच उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे छावणीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र खोतकर यांनी याबाबत अजून घोषणा केली नाही.
मात्र औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काल खोतकरांच्या शिंदे गटात प्रवेशाची वेळही जाहीर करून टाकली. तर त्यांच्या या विधानाला माजी मंत्री सुरेश नवले यांनी देखील दुजोरा दिला आहे.अब्दुल सत्तार, सुरेश नवले आणि अर्जुन खोतकर हे तिघेही काल दिल्लीत होते. आज शुक्रवार 29 जुलै रोजी सत्तार यांनी पुन्हा एकदा माध्यमांची बोलताना सांगितले की, अर्जुन खोतकर हे आमच्या सोबत नक्की येणार. ईडी असो किंवा काही असो , असं म्हणत त्यांनी दावा केला आहे.
दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून असलेले शिवसेनेचे मराठवाड्यातील मोठे नेते अर्जुन खोतकर आज शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11 वाजता अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत. त्यांच्या या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचा लक्ष लागलेलं आहे. गेल्या पाच दिवसांपासून अर्जुन खोतकर दिल्लीत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut । थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे ?, संजय राऊतांचा राज्यपालांना संतप्त सवाल
- MNS । गुण्यागोविंदाने इथे राहावं, नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये; मनसेची राज्यपालांना वार्निंग
- NCP । महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा; राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
- Bhagat Singh Koshyari | ‘गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही’, राज्यपाल कोश्यारींचं वादग्रस्त विधान
- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी सागरराज बोदगिरे यांची निवड
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<