नवी दिल्ली : सध्या शिवसेनेचा खडतर काळ सुरु आहे. रोज शिवसेनेला नवीन धक्के बसत आहेत. आधी शिवसेनेच्या आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील अनेक मंत्र्यांनी, आमदारांनी आणि खासदारांनी त्यांची साथ सोडली. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आणि जवळपास 40 हुन जास्त आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यानंतरही अनेक आमदारांनी शिवसेनेच्या पदांचे राजीनामे दिले आणि शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे आज एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मात्र हा राजीनाम्यांचा सिलसिला काही थांबायचं नाव घेत नाहीये. आज देखील शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेला धक्का देत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे खोतकर हे आता शिंदे गटात सामील झाले असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान शिंदे आणि खोतकर यांच्यातील भेटीचा आणखी एक व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीच व्हायरल झाला होता. त्यानंतर खोतकर शिंदे गटात सामील झाले असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र त्यांनतर “मी शिवसेनेतच राहणार”, असे अर्जुन खोतकर म्हणाले होते. मात्र आज पुन्हा दिल्लीत खोतकरांनी शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे “मी शिवसेनेतच राहणार”, असे म्हणणारे खोतकर आज शिंदे गटात सामील झाले आहेत.
खोतकर आणि एकनाथ शिंदे यांचे काही फोटो सध्या समोर आले आहेत. ज्यावरून हे स्पष्ट होतं कि, खोतकर हे शिंदे गट सामील झाले आहेत. या फोटोत त्यांच्याबरोबर मंत्री रावसाहेब दानवेही दिसत आहेत. याचाच अर्थ दानवे आणि खोतकर यांच्यातील पूर्वीचे मतभेदही संपले आहेत. याआधीच मराठवाडा विभागातून 1 खासदार आणि तब्बल 9 आमदार हे शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यात आता जालन्याचे प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेले अर्जुन खोतकर यांनीही शिवसेनेची साथ सोडल्याने मराठवाड्यातील शिवसेना खिळखिळी होणार असे चित्र निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Eknath Khadse | या सरकारने संपूर्ण महाराष्ट्र वाऱ्यावर सोडलाय – एकनाथ खडसे
- Katrina Kaif | कतरिना कैफला जीवे मारण्याची धमकी; आरोपीविरुद्ध तक्रार दाखल
- IND vs WI : टीम इंडिया फुल जल्लोषात! वेस्टइंडीज विरुध्द विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंची धमाल, पाहा VIDEO!
- Jitendra Awhad : राजकारण हे फक्त सत्तेसाठी करायचं नसतं – जितेंद्र आव्हाड
- Shiv Sena : निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात उद्धव ठाकरेंची सर्वोच्च न्यायालयात धाव
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<