…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर

danave vr khotkar

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरवात झाल्याने राज्यातील मात्तबर नेते हे दंड थोपटून एकमेकांच्या विरोधात राजकीय कुस्तीच्या आखाड्यात उतरलेत आहेत. अशातच राज्याचे लक्ष लागलेली लढत म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे आणि राज्याचे दुग्धविकास आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर. अर्जुन खोतकरांनी दानवेंच्या टीकेला उत्तर देताना जोरदार हल्ला चढवला आहे.

आपले कोण, परके कोण, हे समजायला दानवे तयार नाहीत. आम्ही एवढी वर्षे त्यांच्यासाठी मदतच करीत गेलो आहोत. एवढं करुनही त्यांना कळत नसेल, तर निश्चितपणे ही निवडणूक आणि निवडणुकीचे वातावरण त्यांना कळून चुकलेले आहे. त्यांच्या पायाखालची वाळू आता घसरलेली दिसते. त्यामुळे ते काहीपण बरळायला लागले आहेत. अस अर्जुन खोतकर म्हणाले आहेत.

दरम्यान, जालना जिल्ह्यातील अंवड तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन करण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आले असता, त्यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार याच्यावर टीका केली होती. त्याला अर्जुन खोतकर यांनी जोरदार उत्तर दिल आहे.