रावसाहेब दानवे यांचे शेतकरी प्रेम बेगडी : अर्जुन खोतकर

ravsaheb danve patil

जालना:काल भाजपनेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फक्त घरात बसून काम करतात अशी बोचरी टीका केली होती.

रावसाहेब दानवे यांच्या टीकेचा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी खरपूस समाचार घेतला आहे. भाजप नेत्यांना काय झालंय मला माहित नाही असं सांगत भाजप नेत्यांच्याच मतदार संघात पावसामुळे नुकसान झालं असून त्यांनी त्यांच्याच मतदार संघात दौरे तरी केले का असा प्रश्नही खोतकर यांनी उपस्थित केला.

त्याचबरोबर रावसाहेब दानवे यांचे शेतकरी प्रेम बेगडी असल्याचे देखील अर्जुन खोतकरांनी म्हटले आहे.भाजपच्या लोकांना कधीपासून शेतकऱ्यांचे प्रेम आले, असे विचारून खोतकर म्हणाले, बेगडी प्रेम दाखवून शेतकरी तुमच्याकडे वळणार नाहीत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शेतकरी प्रेमाबद्दल कोणी ऐऱ्यागैऱ्याने बोलण्याची गरज नाही. ते घरात बसून नाहीत. कोरोनावर कुशलपणे मात करत आहेत. भाजपच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे असे दिसते आहे. आपत्कालिन स्थितीत सर्व पक्षांचे नेते एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र यावे असे दिसले पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही अशी खंत देखील खोतकरांनी बोलून दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या-