Share

Dasara Melava | “अगोदर पेपर फोडणार नाही पण…”; शिंदे गटाचे दसरा मेळाव्याबाबत मोठं विधान

मुंबई :  यंदा शिवसेना पक्षाचे दोन मेळावे होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. दसरा मेळाव्याला काहीच तास उरले आहेत. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष आजच्या दसरा मेळाव्यावर लागले असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर दोन्ही गटातील नेते आपल्या गटाचा मेळावा कसा वेगळा असणार, याविषयी सांगताना दिसून येतं आहेत. अशातच शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याबाबत एक विधान केलं आहे.

काय म्हणाले अर्जुन खोतकर ?

अगोदर पेपर फोडणार नाही, पण शिंदे गटाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे मोठा धमाका करतील, असं अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे. अर्जुन खोतकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

दोन खासदार, पाच आमदारांचा बीकेसीच्या मैदानावर प्रवेश झालेला दिसेल

तसेच, खासदार कृपाल तुमाने यांनी शिवसेनेतील दोन खासदार आणि पाच आमदार आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. यावर अर्जुन खोतकर यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, राज्याचे 50 आमदार आणि 12 खासदार सोबत आहेत. आज दोन खासदार, पाच आमदारांचा बीकेसीच्या मैदानावर प्रवेश झालेला दिसेल.

पुढे बलताना खोतकर असंही म्हणाले की, एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन सूरतला, गुवाहाटीला गेले. तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी आमदारांना डांबून ठेवण्याची, हॉटेलमध्ये बंदिस्त करण्याची भूमिका घेतलेली नाही. ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं आणि सोबत राहायचं आहे त्यांनी स्वेच्छेने राहावं ही त्यांची भूमिका स्पष्ट होती. त्यांनी कोणावरही जबरदस्ती केली नाही
शिंदेंसोबत आहे तीच खरी शिवसेना आहे, जी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असल्याचं, असं खोतकर यांनी असंही म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई :  यंदा शिवसेना पक्षाचे दोन मेळावे होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now