‘सेटलमेंट’ च्या वक्तव्यावर अर्जुन खोतकरांची प्रतिक्रिया, दानवे भाषणाच्या ओघात चुकीचे बोलले

blank

टीम महाराष्ट्र देशा :अर्जुन खोतकर आणि माझ्यात निवडणुकीपूर्वी दोन महिने आधीच सेटलमेंट झाले होते. नंतर फक्त नाटक सुरु होते असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काल केलं. त्यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवडझाल्याबद्दल सर्वपक्षीय सत्कार समारंभ काल जालण्यात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

यावर अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाषणाच्या ओघात रावसाहेब दानवे असं म्हणाले, दानवे जे बोलले ते चुकीचे होते. ते टाळल्या जाऊ शकले असते असंही ते म्हणाले. आमच्यात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानेच मनोमिलन झाले असल्याचे खोतकर यांनी सांगितले.