अंगावर आले तर शिंगावर घेण्याचे शिवसेनेला चांगले माहिती आहे – अर्जुन खोतकर

arjun-khotkar

टीम महाराष्ट्र देशा: भाजपचे नेते मागील काही दिवसांपासून शिवसेनेला आव्हान देत आहेत. अंगावर आले तर शिंगावर घेण्याचे शिवसेनेला चांगले माहिती आहे. असा इशारा वजा दम शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजपला दिला आहे ते बदनापूर शिवसेना सदस्य नोंदणीचा प्रारंभ कार्यक्रमात बोलत होते

त्याचबरोबर पक्षाने आदेश दिल्यास पण लोकसभा लढविण्यास तयार आहोत अस देखील खोतकर म्हणाले. बदनापूर विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो परत मिळविण्यासाठी गावागावांत सदस्य नोंदणी सुरू करा, असे आवाहनही यावेळी अर्जुन खोतकर यांनी केले.