fbpx

युती झाली, तरीही शंभर टक्के मी जालन्यातून उभा राहणार आणि विजयीच होणार – खोतकर

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना नेते आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधात दंड थोपटले आहेत. जालन्यात दानवेंना पराभूत करण्याचा निर्धार खोतकारांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, शिवसेना आणि भाजप यांची युती होणार की नाही, याबाबत अद्याप कुठलीच स्पष्टता नाही. कधी शिवसेनेकडून स्वबळाची भाषा होते, तर कधी संजय राऊत ‘मोठा भाऊ किंवा वडील’ अशा बदलत्या भूमिकेत जात युतीचे संकेत देतात.

दुसरीकडे, देवेंद्र फडणवीसांनीही ‘भाजप लाचार नाही, पण युतीला तयार आहे’ असं म्हणत हात पुढे केला आहे. अर्जुन खोतकरांनी मात्र युती झाली, तरीही शंभर टक्के मी जालन्यातून उभा राहणार आणि विजयीच होणार, असं ठणकावून सांगितलं. लोक ज्यांच्या पाठीशी असतात, ते विजयी होतात, असं खोतकर म्हणाले.