fbpx

आज तरी सुटणार का जालन्याचा तिढा ? अर्जुन खोतकर ‘मातोश्री’वर दाखल

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे जालन्यातून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लोकसभेच्या रिंगणात उतरण्यावर अजूनही ठाम आहेत. त्यामुळे युती होऊन देखील जालन्याचा तिढा काही सुटताना दिसत नाही. तेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी खोतकर ‘मातोश्री’वर, दाखल झाले अहून खोतकरांचा तिढा आज सुटण्याची चिन्हं दिसत आहेत.

दरम्यान, शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यामध्ये १४ तारखेला बैठक झाली होती. औरंगाबाद शहरातील बीड बायपास परिसरात दोघांमध्ये गुप्त चर्चा झाली होती. या दोन नेत्यांमध्ये जवळपास दोघांची तासभर चर्चा झाली. जालना लोकसभेच्या अनुषंगानेच ही भेट झाली. दरम्यान, या भेटीनंतर दोन दिवसात अर्जुन खोतकर यांच्याबद्दल गुडन्यूज मिळेल असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी गौप्यस्फोट केला आहे.

त्यामुळे अर्जुन खोतकर यांच्या आजच्या मातोश्री वारीला महत्व प्राप्त झाल आहे. कारण कॉंग्रेस नेते अब्दुल सत्तार यांच्या भेटीनंतर खोतकर शिवबंधन तोडून कॉंग्रेसचा हात हातात घेण्याच्या चर्चना पेव फुटला आहे. तर जालना लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत देखील आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.