खोतकरांना शिवसेनेचा झटका ; स्टार प्रचारकाच्या यादीतून डच्चू

टीम महाराष्ट्र देशा : जालना लोकसभा जागेवरून अडून बसलेले शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे बंड थंड करण्यात शिवसेना आणि भाजपच्या बड्या नेत्यांचे अक्षरशः तोंडचे पाणी पळाले होते. पण आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरवात झाली असताना प्रचाराचा धुरा सांभाळणाऱ्या रणधुरंधरांच्या अर्थात स्टार प्रचारकाच्या यादीत अर्जुन खोतकर यांना शिवसेने स्थान दिलेले नाही. यामुळे हा अर्जुन खोतकारांना मोठा धक्का मनाला जात आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप पाठोपाठ आता शिवसेनेच्या वतीने देखील स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेच्या यादीत युवासेना अध्यक्ष अदित्य ठाकरे यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांच्यासह केंद्रीयमंत्री अनंत गिते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, जल संधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ, आमदार निलम गोऱ्हे, विनोद घोसाळकर, आदेश बांदेकर यांचा समावेश आहे.